झी मराठीवर नुकताच या मालिकेचा प्रोमो झी मराठीवर पाहायला मिळाला. गावाकडून परदेशात नोकरीनिमित्त गेलेला मुलगा पुन्हा घरी येतो. कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या आवडीची भेटवस्तू आणतो आणि शेवटी स्वत:सोबत घेऊन आलेल्या परदेशी मुलीची घरात एन्ट्री होते. या मुलीला पाहून सगळे कुटुंबीयदेखील थक्क होतात. प्रोमो संपल्यावर ही मालिका येत्या २१ ऑक्टोबर २०१९ पासून रात्री ७.३० वाजता झी मराठीवर प्रक्षेपित होणार असल्याचे सांगितले जाते.

तुझ्यात जीव रंगला ही मालिका गेले अनेक दिवस प्रेक्षकांच्या घरात मन करुन होती.  राणादाच्या अचानक बदलेल्या लुकमुळे या मालिकेला वेगळं वळण आलं. मालिकेच्या बदलेल्या रुपामुळे टीआरपी मोठ्या प्रमाणात घसरला आहे. काही प्रेक्षक नाराज दिसतात. झी मराठीवर ‘लग्नाची वाईफ वेंडिगची बायको’ या मालिकेचे प्रोमो सुरु आहेत. ही मालिका २१ ऑक्टोंबर पासून संध्याकाळी ७ः ३० वाजता सुरु होणार आहे.

या पूर्वी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका बंद करण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी दिला होता. गेले अनेक दिवस ही मालिका सुरु असून अनेकदा कथा ताणवली जाते आहे. दुसरीकडे ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका बंद होण्याची घोषणा अजून तरी कुठे झालेली नाही. महत्त्वाचं म्हणजे तुझ्याच जीव रंगला ही मालिका सुद्धा २० ऑक्टोंबर २०१६ रोजी सुरु झाली होती.  तर नक्की ही मालिका बंद होणार की वेळेत बदलली जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.