मित्रांनो!, आजकालच्या बॉलीवूड चित्रपट नगरीत सगळेच पाश्चात्य देशांचे अनुकरण करत त्याला आधुनिकतेचे गोंडस नाव देऊन मोकळे झालेत. बॉलिवूड चित्रपट हे सो कॉल्ड बोल्डनेससाठी ओळखले जाऊ लागले आहेत. आपल्या प्रत्येक सिनेमात एखादा तरी किसींग किंवा इंटीमेट सीन टाकण्यावर दिग्दर्शकाचा भर असतोच. त्यामुळे हिंदीत मोठ्या पडद्यावर किसींग किंवा इंटीमेट सीन्स बघण्याची सवयच जणू प्रेक्षकांना झाली आहे.

आणि हे तर जणूकाही करार करूनच ठरलेले आहे की, जसे बॉलीवूड मध्ये घडेल तसेच तंतोतंत मराठी सिनेसृष्टीसुद्धा करायचेच. त्यामुळेच की काय आता आपली मराठी सिनेसृष्टीसुदधा बोल्ड होऊ लागली आहे. सई ताम्हणकर, स्मिता गोंदकर या अभिनेत्रींनी बिकिनी परिधान करुन हम भी किसीसे कम नही… असे दाखवून दिले आहे.

आता एक पाऊल पुढे टाकत मराठीतील अभिनेता-अभिनेत्री बिनधास्तपणे पडद्यावर किसींग सीन्स देताना दिसत आहेत. बोल्ड सीन, किसिंग हे आजकालच्या सर्व चित्रपटात सर्रास पाहायला मिळतातच. रसिकांनाही यांत काहीही वावगं वाटत नाही. बोल्ड सीन आणि किसिंग सीनशिवाय चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही. हिंदीप्रमाणेच या गोष्टी आता सर्रासपणे मराठी सिनेमातही दिसू लागल्या आहेत.

मराठी सिनेसृष्टीसुद्धा बोल्ड सीन्सने धुमाकुळ घातला आहे. काळानुसार मराठी चित्रपटसृष्टी पूर्णपणे बदलून गेली आहे. आता मराठीतील अभिनेता-अभिनेत्री बिनधास्तपणे पडद्यावर किसींग सीन्स देतानादिसत आहेत. भूमिकेची गरज म्हणून अनेकदा असे सीन्स अभिनेत्रींना द्यावे लागतात.

पण असे सीन शूट करताना मर्यांदा पार होणार नाहीत, तसेच रसिकांनाही ते रुचणार नाहीत अशा कोणत्याच आक्षेपार्ह गोष्टी होणार नाहीत याची देखील मोठ्या प्रमाणत काळजी घेतली जाते. ‘शॉर्टकट’ या सिनेमात अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने अभिनेता वैभव तत्ववादीसोबत लिपलॉक सीन दिला होता तेव्हा या सीनमुळे सिनेमाची जोरदार चर्चा झाली होती.

ऑनस्क्रीन आपल्या सहकलाकारासोबत इंटिमेट होणारी संस्कृती ही पहिली अभिनेत्री नाही, तर या यादीत मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, अमृता सुभाष, उर्मिला कानेटकर, प्रिया बापट, अभिनेत्री तेजश्री प्रधान या मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींचाही यात समावेश आहेच. या अभिनेत्रींनी पडद्यावर बिनधास्तपणे कोणाची ही पर्वा न करता आपल्या सहकलाकारासोबत लिपलॉक सीन्स दिले आहेत. पण विशेष म्हणजे हे सीन्स व्हल्गर वाटणार नाहीत, याची देखील काळजी त्यांनी घेतली होती.

तसेच तेजश्री प्रधानने दिलेला पहिला ऑनस्क्रीन किसीग सीनचीही तुफान चर्चा झाली होती ‘बबलू बॅचलर’ या सिनेमात तेजश्रीने शर्मन जोशीसोबत किसिंग सीन दिला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले होते. तेजश्री आणि शर्मननं यापूर्वी हिंदी नाटकात एकत्र काम केलं होत. तसेच या चित्रपटांमध्ये त्या दोघांची केमेस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती.

तसेच ‘हंटर’ सिनेमात सईने केलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. या सिनेमात तिने अतिशय बोल्ड सीन्स दिल्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. या सिनेमात सईसह राधिका आपटेही झळकली होती. सिनेमात किचनमध्ये सईने दिलेल्या किसींग सीनमुळे सर्वांना चकित केले होते. तुम्ही कुटंबासोबत हा सीन पाहूच शकणार नाही. या सीनमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

तसेच अभिनेत्री प्रिया बापटची पहिली वहिली वेब सीरिज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘हॉटस्टार’ वरील ही वेब सीरिज आणि त्यामधील प्रियाचा बोल्ड सीनबद्दल त्यावेळी मोठ्या प्रमाणत चर्चा झाली होती. आश्चर्याची बाब म्हणजे, तो सीन अभिनेत्री गीतिका त्यागी सोबतचा म्हणजेच लेस्बियन टाइपचा होता. तिच्या या एका बो’ल्ड सीनमुळे प्रिया बापटचा दक्षिण भारतातील गुगल सर्च वाढला होता.

मराठीतील पहिला वहिला ‘लिपलॉक किसिंग सीन केलेला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा ‘जोगवा’ यामध्ये मुक्ता बर्वेने अनके किसिंग सीन दिले होते. देवीला अर्पण केलेली मुले-मुली या अनिष्ट रुढींवर प्रकाश टाकणाऱ्या विषयावर हा चित्रपट बनविण्यात आला होता. २५ सप्टेंबर २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची कौतुकाची थाप आणि समीक्षकांची वाहवा मिळवली होती.