मित्रांनो!, सोनी टेलिव्हिजनवरील नेहमीच टॉप रँकिंगमध्ये राहणारी तुफान लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ तर तुम्ही पाहतच असाल, मग आपल्या बोल्ड व बिनधास्त अभिनय आणि सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असणारे तारक मेहतामधील प्रसिद्ध पात्र बबिताजी म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री मुनमुन दत्ताने नुकतेच एक हॉट आणि सिझलिंग फोटो शूट केले आहे.

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की ‘तारका मेहता का उल्टा चष्मा’मधील बबीता जीच्या बोल्ड फोटोशूटवर जेठलालच काय परंतु त्याचा मुलगा म्हणजे टप्पू ही झालाय फिदा. टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ता ऊर्फ बबीता जी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मधील तिच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक ठसा उमटविला आहे.

शोमध्ये जेठालाल नेहमीच बबिताजींसोबत फ्लर्ट आपल्याला पाहायला मिळतो. छोट्या पडद्यावरील ही अत्यंत लोकप्रिय मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपले मनोरंजन करत असून तिने आजवर ३२०० भागांचा टप्पा पार केलेला आहे. या मालिकेतील टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट पुन्हा एकदा ट्रोलिंगचा शिकार झाला आहे.

राजने मालिकेत बबिताजींची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताच्या एका पोस्टवर प्रेम चिन्हांची कमेंट केल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले आहे. मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मुनमुनने आधी जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि नंतर लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

मुनमुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे राजच्या कमेंटने वेधले आहे. राजने फायर इमोजी सोबत हार्ट इमोजी कमेंटमध्ये वापरल्याने सोशल मीडियावर तो ट्रोल झाला आहे. राजला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, ‘टप्पू, काकूला पटवलं तू.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मुनमुन दत्ता आणि राज अनादकर यांच अफेअर असल्याचे चित्र दिसतं आहे.

दोघांनाही थोडी लाज वाटली पाहिजे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘राज आणि मुनमुनचं लग्न होणार.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘राज बेटा मस्ती नाही पण तुझी चॉईस सुंदर आहे.’ मुनमुन दत्ताच्या बद्दल सांगायचे झाले तर तिने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती.

मुनमुन दत्ताचा जन्म २८ सप्टेंबर, १९८७ साली पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूरमध्ये झाला होता. अभिनेत्री मुनमुन दत्ताचे शिक्षण कानपूर आणि मुंबईतून पुर्ण केले आहे. २००४ साली हम सब बारातीमधून मुनमुन दत्ताने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.