मित्रांनो! सध्या संपूर्ण सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेल्या तारक मेहता मालिकेमधील टप्पू आणि बबिता जीची भूमिका साकारणाऱ्या राज अनादकत आणि मुनमुन दत्ता यांच्यावर नेटकऱ्यांनी अत्यंत खाजगी आणि वाईट भाषेत टीका व मिम्स स्वरूपात टिंगल टवाळी केलीय. त्यावर टप्पूने व बबिताजी या दोघांनीही खुलासे करत आपल्या भावनांना वाट करून दिलीय. काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की, दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत.

ही बातमी जाणून चाहत्यांनाही आश्चर्य वाटले. आधी दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, पण आता मुनमुन आणि राज यांनी सोशल मीडियावर आपली बाजू मांडली आहे. मुनमुनने प्रथम सांगितले की, तिला भारताची मुलगी असल्याची लाज वाटते, तर मुनमुन नंतर आता राज या संपूर्ण प्रकरणावर बोलला आहे. राज यांनी त्यांच्याविरोधात चुकीचे लिहिणाऱ्यांना संदेश दिला आहे की ,अशा बातम्यांमुळे त्यांच्या जीवनावरही परिणाम होतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

राजने काय लिहिले ते जाणून घ्या… राजने लिहिले की, ‘जो कोणी माझ्याबद्दल काहीही लिहित आहे, फक्त विचार करा की तुमच्या या बनावट कथांचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो. माझे मत जाणून न घेता माझ्याबद्दल काहीही लिहित आहात. जे काही सर्जनशील लोक माझ्याबद्दल लिहित आहेत, त्यांची सर्जनशीलता इतरत्र दाखवा. देवा! त्या लोकांना थोडी समज दे.

यावर बबिता काय म्हणाली हे पण जाणून घ्या… ‘मला तुमच्याकडून यापेक्षा खूप चांगल्या अपेक्षा होत्या. पण कमेंट्समध्ये जी घाण तुम्ही ओतली, त्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे, तथाकथित ‘सुशिक्षीत’ असूनही आपण एका मागासलेल्या समाजाचा भाग आहोत. केवळ स्वत:च्या मजेसाठी एखाद्या महिलेच्या वयावर, तिच्या संबंधांवर नको ते बोलून तिला लाजीरवाणं केलं जातं.

मग या विनोदामुळे भलेही एखादी व्यक्ती मेंटल ब्रेकडाऊनच्या अवस्थेत गेली तरी तुम्हाला फरक पडत नाही. मी गेल्या १३ वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करतेय. पण माझ्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगायला तुम्हाला १३ मिनिटंही लागली नाहीत. तुमचे शब्द एखाद्याला आत्महत्या करायला भाग पाडतील, त्याआधी फक्त एकदा विचार करा. तुमचे शब्द एखाद्याला टोकाचं पाऊल उचलण्यासाठी प्रवृत्त तर करत नाहीत ना, याचा विचार करा. आज मला स्वत:ला भारताची लेक म्हणताना लाज वाटतेय.

तिने मीडियालाही चांगलंच सुनावलंय, ती म्हणाली की, “कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्यावर काल्पनिक बातमी देण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिलेत? तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या आयुष्यावर जो काही परिणाम होतो, त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात का? एखाद्या स्त्रीने नुकताच तिचा मुलगा किंवा प्रियकर गमावला असेल तरी तुम्ही त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढता, हे सगळं फक्त तुम्ही तुमच्या टीआरपीसाठी करता. पाहिजे ते वृत्त किंवा हवं ते हेडिंग देत तुम्ही कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का देऊ शकता. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर तुम्ही या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि हे जमणार नसेल तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटली पाहिजे.”