मित्रांनो! बॉलिवूड मधील सर्वात जेष्ठ, आदरणीय आणि आदर्श जोडपे म्हणून दिगज्ज अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याकडं पाहिलं जातं. जया आणि अमिताभ बच्चन यांची लव्हस्टोरी तुम्हा आम्हा सगळ्यांनाच ठाऊक आहे. मीडिया सूत्रांच्या माहितीनुसार, जया बच्चन कॉलेजच्या दिवसांपासून अमिताभ बच्चन यांना पसंत करत असे. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

१९७२ साली रिलीज झालेला चित्रपट ‘बंसी बिरजू’ मध्ये दोघे पहिल्यांदा एकत्र झळकले होते. जंजीर, शोले, चुपके चुपके, अभिमान सारख्या हिट चित्रपटात दोघांनी काम केलं आहे. मात्र नुकतेच शतकाचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीच्या १३ व्या पर्वाच्या मंचावर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात संकट आलं आहे. असं वक्तव्य केलंय.

तर मित्रांनो! नेमकं काय आहे हे प्रकरण? ज्याच्यामुळे अमिताभ जाहीरपणे असे म्हणाले. चला जाणून घेऊ या. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो कौन बनेगा करोडपतीचा तेराव्या सिझनच्या होस्टींगमध्ये सध्या बिग बी व्यस्त आहेत. या शोमध्ये अमिताभ बच्चन प्रत्येक स्पर्धकाला प्रश्न विचारण्या व्यतीरिक्त अनेक मनोरंजक गप्पा गोष्टी करताना दिसतात.

पण गुरुवारच्या भागात शूटिंगच्या दरम्यान कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर प्रेक्षकांच्या रांगेत बसलेली एक महिला फॅनकडून बिग बींना प्रचंड अटेंन्शन मिळत होते. ही महिला फॅन वांरवार अमिताभ बच्चन यांना फ्लाइंग किस देत होती. अनेकदा तिचे हे फ्लाईंग किस देणे सुरूच होते. मुळातच अत्यंत नम्र, लाजाळू आणि संयमी असणारे अमिताभ त्या महिला फॅन कडून वारंवार केल्या जाणाऱ्या त्या कृत्यामुळे अत्याअधिक अस्वस्थतेने विचलित होत होते. शेवटी त्यांचा संयम संपला.

या वेळी मात्र बिग बी त्या महिला फॅनला म्हणाले, की देवीजी, आपल्या अशा या कृत्यामुळे माझ्या सुखी समाधानी आणि हसत्या खेळत्या संसारात अडचण येऊ शकते. शोमध्ये हॉट सीटवर बसेली स्पर्धक कल्पना दत्ता यांनी १२ लाख ५० हजार रुपयाच्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले. यानंतर अमिताभ बच्चन यांनी ब्रेक घेतला.

ब्रेक दरम्यान जी महिला फॅन बिग बींना फ्लाईंग किस देत होती. तिच्याकडे जाऊन अमिताभ बच्चन म्हणाले, हे पाहा मॅडम, तुम्हाला आधीच खरं-खरं सांगतो. तुमच्यामुळे माझ्या वैवाहिक जीवनात प्रचंड मोठे संकट कोसळले आहे. तुम्ही इतक्या साऱ्या किस पाठवत आहात. अमिताभ बच्चन यांचे उत्तर ऐकून शोमध्ये उपस्थित असलेल्या सर्व टिममध्ये तसेच स्पर्धक, प्रेक्षकांमध्ये हशा पिकला…