आज मनोज वाजपेयी हे नाव जरी घेतलं, तरी त्या अभिनेत्याने साकारलेल्या अगणित अप्रतिम भुमिका आपल्या नजरेसमोरून सहज तरळून जातात. नुकताच या प्रगल्भ आणि उत्कृष्ट दर्जाच्या अभिनेत्याचा जन्मदिवस पार पडला. नाही म्हटलं तरी आज हा अभिनेता म्हणजे प्रत्येकासाठी एका प्रेरणादायी व्यक्तीमत्वाचं उदाहरण आहे, त्याने आज सर्वांकरता एक आदर्श निर्माण केला आहे. त्याला कारणदेखील तसचं आहे म्हणा.
बिहारच्या एका छोट्याश्या गावातून आलेला एक मुलगा आज बॉलीवुडवर अधिराज्य गाजवतो आहे. मनोज वाजपेयीकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला एक जाणिव नक्कीच होते की, केलेल्या कष्टाचं नक्कीच सार्थक होतं. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आजपर्यंत तब्बल तीन नॅशनल अवॉर्ड कमावलेला मनोज वाजपेयी आजदेखील तितक्याच जोमाने नव्याने त्याच्या भुमिका साकारताना पहायला मिळतो.
सुरूवातीला थिएटरपासून सुरूवात केलेला हा अभिनेता आज वेबसिरीज आणि सिनेमे या क्षेत्रांना अगदी सर्वचरित्या गाजवत असल्याच पहायला मिळतं. आजचा सिनेसृष्टीकडे पाहणारा किंवा सिनेसृष्टीत वळू पाहणारा भलामोठा चाहतावर्ग मनोज वाजपेयीने कमावला आहे.
आपल्या अभिनयातील सहजता, लकब, भाषेवरील प्रभुत्व, अभिनयातील अगदी बारीकसारीक कसब यांसारख्या गोष्टी मनोजकडे अगदी उत्तमरित्या पहायला मिळतात ज्या त्यांनी निभावलेल्या पात्राला एका वेगळ्याच दृष्टीकोनात नेऊन ठेवतात. खरतरं या सर्व गोष्टींशिवाय मुळात एक गोष्ट म्हणजे, मनोज वाजपेयींच्या खाजगी आयुष्याबाबत त्यांच्या चाहत्यावर्गाला अनेकदा उत्सुकता लागून राहिल्याची सोशल मीडियावर पहायला मिळाली आहे. चला तर मग ही खास गोष्ट आज आपण जाणून घेऊयात जी आजवर अनेकांना ठाऊकचं नव्हती.
खरतरं मनोज वाजपेयी यांचे दोन लग्न झाले आहेत. त्यांची दुसरी पत्नी ही एक अभिनेत्रीच आहे ही बाब फारच विशेष आहे. करियरची अगदीच नवी सुरूवात झालेली असताना दिल्लीत एका मुलीसोबत मनोज यांनी लग्न करून टाकलं, परंतु दुर्दैवाने हे लग्न केवळ काही महिनेच टिकू शकलं. पुढे दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या झाल्या. लग्नानंतर झालेल्या घटस्फोटाने मनोज वाजपेयी बरेच खचून गेले होते.
आणि नेमक्या त्या पुढील काळात मनोज यांची ओळख बॉलीवुडमधील अभिनेत्री शबाना रजा अर्थात नेहा यांच्यासोबत झाली. शबानाने आपलं सिनेमातील नाव नेहा ठेवलेलं होतं. मनोज आणि नेहा यांची भेट झाली, त्या भेटीची मुलाकात हळूहळू मैत्रीत झाली. आणि या मैत्रीला प्रेमाचे बंध धागेदोरे जुळायला फार काळ नाही लागला. खरतरं नेहा ही फारकाळ नंतर सिनेमांमधे पहायला मिळाली नाही.
मनोजसोबत लग्न केल्यानंतर तिने एक अभिनेत्री म्हणून अभिनयापासून दुर राहण्याचा निर्णय घेतला. आज मनोज आणि नेहा यांचा संसार अगदी सुखरूपरित्या चालू असल्याचा पहायला मिळतो आहे. दोघांना एक मुलगीदेखील आहे. मनोज वाजपेयीकडे आज नव्या कामांची अगदी भरसाठ यादी तयारच आहे असं म्हणावं लागेल, शेवटी इतक्या उत्तम आणि दर्जेदार कलाकाराकडे कायमच कामाची वर्णी लागलेली असणार यात काही शंकाच नाही.
द फॅमिली मॅन, भोसले, सायलेन्स, गॅं’ग्ज ऑफ वासेपुर 1 आणि 2, सत्या, शुल यांसारख्या कितीतरी दर्जेदार प्रोजेक्टमधून मनोज वाजपेयींनी आपल्या कामाची पोचपावती रसिकप्रेक्षकांकडून मिळवली आहे. आज अनेक दिग्गज व्यक्तीमत्वेसुद्धा मनोज वाजपेयींची अनेकदा तारीफ करत असल्याचही पहायला मिळतं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!