मित्रांनो!, मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काही महिन्यांपूर्वी कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली हे आपण सर्वजण जाणतोच. सध्या हे कपल कुठं आहे म्हणाल? तर ते मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेतंय. सोनालीच्या या मालदीव व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मालदीवच्या या अलिशान रिसॉर्टमध्ये आहे ‘अप्सरे’चा मुक्काम, एक दिवसाचं भाडं माहितेय का? नाही!… जाणून घ्या.

सोनाली कुलकर्णी काही महिन्यांपूर्वी कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर आफ्रिकेतील सीशेल आयलँडवर हे कपल ‘मिनीहनीमून’ला गेलं होतं. सध्या हे कपल कुठं आहे तर मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेतंय. सोनालीच्या या मालदीव व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

मालदीवच्या ट्रिपचे बरेच फोटो सोनालीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फ्लाईट राईड, रिसॉर्ट, समुद्र किना-यावरची धमाल हे सर्व अपडेट्स ती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

मालदीव हे पर्यटनप्रेमींचं आवडतं ठिकाण आहे. स्वच्छ, सुंदर आणि निळाशार समुद्र किना-यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या मालदीवमधील सोनाली व कुणालचे फोटो दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत. पण सोनाली व कुणाल हे ज्या रिसॉर्टमध्ये थांबले आहेत, ते रिसॉर्टही कमी सुंदर नाही.

अगदी पाहून डोळे दिपतील, इतके सुंदर आहे. होय, सोनाली व कुणाल मालदीवमधील कंदीमा रिसॉर्टमधील हनिमून अ‍ॅक्वा पूल व्हिलामध्ये या जोडप्याचा मुक्काम आहे. समुद्राच्या मधोमध असलेल्या या अलिशान रिसॉर्टची बातच न्यारी. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला निळाशार समुद्र, वर निळशार आकाश, व्हिलाला जोडून असलेला पर्सनल स्विमींग पूल आणि लक्झरी सर्व्हिस असं सगळं काही इथे आहे.

साहजिकच यासाठी मोठी किंमतही मोजावी लागते. होय, सोनाली व कुणाल राहत असलेल्या या कंदीमा रिसॉर्टमधील हनिमून व्हिलाचे एकादिवसाचे भाडे 2455.88 डॉलर आहे. भारतीय रूपयांत सांगायचं झाल्यास दर दिवसांचं भाडे दीड ते दोन लाखांच्या घरात आहे.

सोनालीचा पती कुणाल हा फायनान्स क्षेत्रात काम करतो. मूळचा तो लंडनचा पण जॉब साठी दुबई मध्ये स्थायिक झाला आहे. लग्नानंतर सोनालीही त्याच्या सोबत दुबई मध्ये स्थायिक झाली आहे. पण शूटिंगसाठी ती भारतात येते. महाराष्ट्राची अप्सरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनालीची फॅन फॉलोविंग बरीच मोठी आहे. इंस्टाग्रामवरील तिच्या सर्व पोस्टवर तिचे चाहते नेहमीच लाईक आणि कमेंट करून आपले प्रेम दर्शवत असतात.असो…