कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाचा परिणाम म्हणून, भारताच्या माननीय पंतप्रधानांकडून, २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून, हा लॉकडाऊन आपण पाळायलाच हवा. मराठी मनोरंजन विश्वावर सुद्धा याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे मालिकांचे चित्रीकरण सुद्धा बंद आहे. नेहमी व्यस्त असणाऱ्या कलाकारांना स्वतःसाठी थोडा मोकळा वेळ मिळालेला आहे. ‘झी युवा’ वाहिनीवरील, ‘युवा डान्सिंग क्वीन’ स्पर्धेची परीक्षक, सोनाली कुलकर्णी, हिने हा वेळ सत्कारणी लावायचा निश्चय केलेला आहे. आवडीचे अनेक खाद्यपदार्थ करण्यात वेळ घालवण्याचे तिने ठरवले आहे.
अर्थात, चमचमीत पदार्थ खात असताना, आरोग्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, याची सुद्धा ती काळजी घेत आहे. जिम बंद असण्याचा कुठलाही परिणाम तिच्या व्यायामावर झालेला नाही. सूर्यनमस्कार घालत असतानाचा तिचा विडिओ नुकताच व्हायरल झालेला आहे. आरोग्य उत्तम राहावं यासाठी ती दिवसाला १०८ सूर्यनमस्कार घालत असल्याचं म्हटलं जात आहे. स्वतःच्या फिटनेसची उत्तम काळजी घेत असलेली सोनाली, अनेकांसाठी आदर्श सुद्धा ठरली आहे. अनेकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या सोनालीकडून, तिचे चाहते फिटनेसचे धडे घेत आहेत. या ‘फिट अँड फाईन’ सोनालीला टीव्हीवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते, ती ‘झी युवा’ वाहिनीवर! फिट सोनालीच्या दिलखेचक अदा अनुभवण्यासाठी, पाहत रहा, ‘युवा डान्सिंग क्वीन’, बुधवार ते शुक्रवार, रात्री ९.३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या ‘झी युवा’ वाहिनीवर!!