सध्या लग्न विधी खूप जोरात चालू आहे. मग यात कलाकार पण मागे नाहीत. अनेकांनी या को’रो’ना काळात सुद्धा लग्नाचा बार उडवलेला आहे. जो की चाहत्यांना खूप आवडतं आहे. म्हणजेच व्हायरल होत आहे.

अनेक सेलेब्रिटी लोकांनी या काळात लग्न करून वैवाहिक जीवनाची सुरुवात केलेली आहे. मग त्यात कार्तिकी गायकवाड किंवा इतर अभिज्ञा वगैरे. एवढंच नाहीतर हिंदी आणि तेलगू मध्येही खूप जणांनी लग्न केली.

त्यात नेहा कक्कड आणि रोहणप्रित यांच्या लग्नाचे तर खूप गोष्टी व्हायरल झाले होते. मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी लोकप्रिय कलाकार तर आपल्या सर्वांना माहीतच असतील.

 

तर त्यांचे काही फोटोज सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहेत. का ? तर ते आता लग्न करत आहेत. लग्नाच्या विधीला सुरुवात झालेली आहे. तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

 

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नाच्या विधींना सुरवात झाली आहे. ग्रहमखचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना सिद्धार्थने सोड मुंज झाली, आता जातो काशीला ओके बाय अशी फनी कॅप्शन दिली आहे.

मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई चौघड्यांचे सुर ऐकू येत आहेत. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णी, मानसी नाईक आणि आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्याही लग्नाचे सुर ऐकायला मिळत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर तो क्षण आला आणि आता हे कपल त्यांच्या आयुष्याची नविन सुरवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

या दोघांच लग्न पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या एका जुन्या वाड्यामद्धे होणार आहे. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी खुप उत्साही आहेत. लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते चाहत्यांसह शेअर करत असतात.

त्यांचे लाखो चाहते महाराष्ट्र मध्ये आहेत. आणि दोघांची जोडीही अनेकांना आवडते. सध्या तर दोघे चर्चेत आहेत. एकदाचे ते वैवाहिक जीवन सुरू करत आहेत. दोघांच्या या नव्या प्रवासाला स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.