महाराष्ट्र चे वैभव अहमदनगर जिल्ह्यातील व राहुरी नगरीचे भुमिपुत्र असलेले व त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय किर्तीचे विश्वशिवशाहिर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्र परिसरात बांधकाम करण्यात आलेल्या शिवाश्रमाचा लोकार्पण सोहळा येत्या 25 डिसेंबरला संपन्न होणार आहे.

शिवाश्रमासाठी सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे केंद्राध्यक्ष मधुकर गीते व त्यांच्या कुटुंबीयांनी 50 गुंठे जमीन विनामूल्य दान करून अवघ्या नऊ महिन्याच्या कालावधीत या जागेवर 4200चौरस फूट आकाराची भव्यदिव्य शिवाश्रम इमारतीची उभारणी झाली आहे.

शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांनी त्यांच्या पोवाड्याच्या त्याचबरोबर किर्तन व्याख्यान आदी कार्यक्रमातून जमा झालेले मानधन शिवाश्रमासाठी तसेच आईने शिवाश्रमासाठी जमा करून ठेवलेले एक लाख तसेच महाराष्ट्रातील विविध दानशूरांनी यथाशक्ती वस्तू व आर्थिक स्वरुपात मदत केली. या सर्वांच्या सहकार्यातून शिवाश्रमाची भव्य इमारतीची निर्मिती झाल्याची भावना तनपुरे महाराज यांनी व्यक्त केली आहे.

समाजातील दिव्यांग घटकांच्या आर्थिक व सामाजिक उत्कर्षासाठी अंध अपंग निराधारांना आधार व लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन अधिकारी बनण्याची स्वप्न बाळगणाऱ्या युवकांना येथे मार्गदर्शन केंद्रामार्फत राजपत्रित अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन होणार आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारातून आर्थिक पाठबळ निर्मितीचा या केंद्राचा हेतू असून, हे केंद्र निवासी स्वरूपाचे असून निराधार व्यक्तींना या केंद्राचा मोठा आधार लाभणार आहे. दिव्यांगांना समाजात सन्मानाने जगता यावे म्हणून डॉ.विजय तनपुरे यांची धडपड सुरू आहे.

आपल्या शिवगर्जना व शिवायण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारी रक्कम तनपुरे महाराज बाजुला ठेवत आहे. त्यांचे गुरू राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे शिवाश्रमाची स्वप्न होते .त्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले, परंतु अडथळ्यांची शर्यत पार करत असताना त्यांना अपयश येत होते. त्यामुळे जोपर्यंत शिवाश्रम निर्मिती होत नाही तोपर्यंत आपण पायात चप्पल घालणार नाही असा निर्धार त्यांनी साडेचार वर्षांपूर्वी केला. त्यामुळे सुमारे साडेचार वर्षापासून तनपुरे महाराज अनवाणी महाराष्ट्रभर फिरत कार्यक्रम करत आहे .

शिवाश्रमाची निर्मिती झाल्यामुळे त्यांचा हा संकल्प तडीस जाणार आहे.शिवाश्रम हा समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीतून उभा रहात असून अनेकांनी यथाशक्ती त्यासाठी योगदान दिले आहे याशिवाय श्रमाच्या निर्मितीमध्ये मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे केंद्राध्यक्ष मधुकर गीते त्यांची पत्नी शीला, मुलगा दीपक, सून वनिता हे अहोरात्र शिवाश्रम निर्मितीसाठी कुठलेही अपेक्षा व्यक्त न करता एक आपल्या घरचेच कार्य म्हणून त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले आहे.शिवाश्रम बांधकामाच्या निर्मितीत लागणारे सर्व सहकार्य तसेच मदतनिधी व वस्तू रूपाने दानशूरांना शिवाश्रमासाठी सर्व प्रकारची मदत केली जात आहे. शिवाश्रमाची निर्मिती यापूर्वी शिर्डी येथे विमानतळ परिसरात होणार होती परंतु तिथे मूळ जागेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने तेथील शिवाश्रम बांधकामास स्थगिती देण्यात आली.

दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता शिवाश्रमाचे सिन्नर तालुक्यातील मेंढी या गावामध्ये सहारा व्यसनमुक्ती केंद्राच्या परिसरात लोकार्पण कार्यक्रम होणार असून, त्या निमित्ताने महाराष्ट्रातील थोर प्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे दुपारी चार वाजता कीर्तन होणार असून त्यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवाश्रमाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

शिवाश्रमाच्या या लोकार्पण सोहळ्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, खासदार छत्रपती संभाजी महाराज , महंत भास्करगिरी महाराज, ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू ,श्री.कृष्णप्रकाशजी विशेष पोलिस महानिरीक्षक सुमंतबापू हंबीर,आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार पुण्याच्या लिज्जत पापड चे संचालक सुरेश कोते नाशिकचे खासदार हेमंत गोडसे सिन्नर तालुक्यातील किर्तांगळी गावचे भूमिपुत्र व सध्या दिल्ली नोएडा येथील सुदर्शन न्युज चॅनेल चे संचालक सुरेश चव्हाणके सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे माजी आमदार राजाभाऊ वाजे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे संगमनेरचे मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी पुण्याचे शिवभक्त अभिनेते सचिन गवळी स्नेहालय संस्थेचे गिरीश कुलकर्णी दीपस्तंभ संस्थेचे यजुर्वेद महाजन शांतीवन( बीड) चे दीपक नागरगोजे पुण्याचे उद्योजक विजय सेठी , गुजरातचे योगेंद्र सहानी आदी मान्यवर या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्‍हान शिवाश्रमाचे वतीने करण्यात आले आहे.