बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज शिव ठाकरेला भेटायला त्याची बहीण मनीषा आणि आई आशा येणार आहेत… घरामध्ये आल्यावर शिवच्या आईने धम्माल आणली… आईला बघून शिव खूप खुश झाला, आईच येणार माहिती होते असेही तो म्हणाला… रूपालीला बोलताना शिवची आई म्हणाली हा बदमाश आहे… शिवशी बोलताना त्या म्हणाल्या किशोरी ताई म्हणतोस तर शिवानी, हीना आणि विणा सर्वच बहिणी आहेत तुझ्या… या वाक्यावर सर्वांना हसू फुटले…. राखी देते बांधुन घे”… आता नक्की त्यांना काय म्हणायचे होते हे जर शिवपर्यंत पोहचले तर ठीक !
शिवच्या आईसोबत शिवची बहीण मनीषा देखील घरामध्ये जाणार आहे… शिवच्या बहिणीने त्याची कानउघडणी केली… आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तो का आला आहे … तिचे म्हणणे होते, “अमरावती काय, विदर्भ काय संपूर्ण महाराष्ट्र तू ट्रॉफी घेऊन याव म्हणून प्रयत्न करत आहे… हा कार्यक्रम बघत आहे, ज्यांना बिग बॉस समजत देखील नाही तेदेखील फक्त तुझायसाठी बघत आहेत… तुझा फोकस हलतो आहे शिव… तुझ्या एकट्यासाठी भांड सगळेजण इथे समर्थ आहेत आणि म्हणूनच आलेना इथे खेळायला, तुझ्या भरावशावर आल आहे का कोणी ? तू दुसर्यांसाठी का भांडतो ? दुसर्यांची का बाजू घेतोस ? ती समर्थ आहे ना ? तू तुझ तुझ भांड तीच तिला भांडू दे” यावर शिवच्या आईचे म्हणणे पडले, “ती प्रत्येक गोष्टीमध्ये समोरच्याला बोलू शकते ती हुशार आहे”.
अजून एक महत्वाचा मुद्दा शिवच्या बहिणीने मांडला आणि तो म्हणजे, सगळ्या सदस्यांसोबत रहा एकटे नका राहू… इतके मोठे मोठे लोक आहेत किशोरी ताई आहेत, इतकी सुंदर अभिनेत्री नेहा आहे जिचा अभिनय तुला आवडायचा… यांच्यासोबत तुम्हाला एकत्र रहायला मिळत आहे”…
शिवच्या आईने आणि बहिणीने दिलेले मोलाचे सल्ले, मार्गदर्शन घेऊन आता शिव पुढे चालेल ? त्याच्यामध्ये काही फरक पडेल ? पुन्हा त्याचा गेममध्ये फोकस येईल ? हे कार्यक्रम बघताना कळेलच… तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.