शिवानी रांगोळे ‘&’ तिची ‘जरा हटके’ भूमिका
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक उदयोन्मुख नायक नायिकांना सुगीचे दिवस आले आहे. नवीन विषय आणि चेहऱ्यांना घेऊन चित्रपट बनवण्याऱ्या होतकरू दिग्दर्शक आणि निर्मात्यांमुळे आज अनेक तरुण कलाकारांना मराठी चित्रपटसृष्टी खुणावत आहे. इरॉस इंटरनॅशनल च्या क्रीशिका लुल्ला प्रस्तुत आणि दिग्दर्शक रवी जाधव निर्मित ‘& जरा हटके’ या चित्रपटामार्फत प्रेक्षकांसमोर येणारी शिवानी रांगोळे हे नाव देखील त्यातलेच एक म्हणावे लागेल.
दिसायला अल्लड, अवखळ आणि तितकीच चुलबुली असणाऱ्या शिवानीला आपण लवकरच ‘& जरा हटके’ या चित्रपटातून पाहणार आहोत.
‘आस्था’ या १७ वर्षाच्या मुलीची भूमिका ती या सिनेमात करत असून त्यामध्ये ती पॉजिटीव्ह, समजूतदार पण वयाबरोबरच खेळकर अशी आहे. शिवानी देखील आपल्या भूमिकेबद्धल खूप उत्सुक असल्याचे सांगते. किशोर वयात आलेल्या मुलीची मानसिकता आणि भावना अगदी तत्परतेने तिने या चित्रपटातून मांडली आहे. बालपण आणि तरुणपण अशा संवेदनशील वयात आलेली ही कॉलेज तरुणी आधुनिक विचारांची, आणि स्वच्छंद आयुष्य जगणारी आहे. तिला स्वतःचे विचार आणि स्वातंत्र्य आहे, त्यामुळे आपल्या आईच्या पुनर्विवाह करण्याच्या निर्णयावर तीच्या नजरेतून बदलत जाणारी मानसिकता, तसेच एकाबाजूला आईच्या लग्नासाठी खुश असतानाच दुसरीकडे वडिलांच्या जागेवर कोणा दुसऱ्याला पाहताना तिला होणारा त्रास, अगदी मार्मिक आणि भावनिक पद्धतीने या चित्रपटात साकारताना दिसणार आहे. कालानुरूप बदलत जाणाऱ्या नात्यांच्या समीकरणात अडकलेल्या ‘आस्था’ या व्यक्तिरेखाला योग्य न्याय देण्याचे मोठे आव्हान शिवानीने आपल्या अभिनयाच्या बळावर लीलया पेलले आहे. ‘& जरा हटके’ मधील तिने साकारलेली ‘आस्था’ तिच्या अभिनय कारकिर्दीला एक नवा आयाम देणारा ठरणार आहे.
मुळात आंतरमहाविद्यालयीन नाट्य आणि एकांकिका स्पर्धेतून अभिनयाचे धडे गिरवणारी शिवानी यापूर्वी अनेक छोट्यामोठ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. अनेक नाट्यस्पर्धेतून स्वतःला सिद्ध करणाऱ्या शिवानीने सर्वप्रथम ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती. त्यानंतर अंकुश चौधरी व मुक्ता बर्वे अभिनित ‘डबल सीट’ या चित्रपटातही ती छोट्या भूमिकेत दिसून आली, शिवाय सुजय डहाके याच्या ‘फ़ुंतरु’ मधील भूमिकेमुळे तीला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली..मात्र, आता प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी ‘& जरा हटके’ चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
मिताली जोशी लिखित या चित्रपटातला ‘&’ इतरांहून जरा हटकेच असल्यामुळे ‘& जरा हटके’ हा चित्रपट कुतूहलाचा विषय ठरत आहे. शिवानी रांगोळे सोबत
मृणाल कुलकर्णी, बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता, सिद्धार्थ मेनन हे कलाकारही आपल्याला या सिनेमात पाहता येणार आहेत. नात्यांमधले बदलते स्वरूप दाखवणारा हा सिनेमा २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Shivani Rangoli ‘&’ Her ‘A Just Set Back’ Role