बॉलिवूडमध्ये अनेक यशस्वी अभिनेत्री आहेत ज्यांनी आपले वैवाहिक आयुष्य सांभाळत सिनेसृष्टीत यश प्राप्त केलेलं आहे. परंतु काही अभिनेत्रींच्या नशिबामध्ये हे सुख नाही असे देखील आपण म्हणू शकतो. बॉलिवूडमध्ये शांतीप्रिया नावाची एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. लग्नाच्या काही वर्षांनंतरच शांतीप्रिया यांच्या पतीचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर शांती प्रियाने एकटेच जीवन व्यतीत केलेले आहे. आज या लेखामध्ये आपण शांतीप्रिया या अभिनेत्रीच्या जिवनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
शांतीप्रिया या अभिनेत्रीने 1991 मध्ये रिलीज झालेल्या ” सौगंध ” या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील कामामुळे शांतीप्रिया बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर, तिने फुल और अंगार, वीरता तसेच ईक्के पे ईक्का अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे तिचे लाखो फॅन्स देखील तयार झाले होते.
शांती प्रियाने 1999 मध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ रे याच्याशी लग्न केलं होतं. शांतीप्रिया आणि सिद्धार्थ यांना दोन मुलं देखील आहेत. त्यांचं वैवाहिक आयुष्य देखील खूप चांगलं व्यतीत होत होतं. पुढे 2004 मध्ये सिद्धार्थ हार्ट अटॅक मुळे वयाच्या चाळीसाव्या वर्षी मृत्यू झाला. या कठीण प्रसंगी शांतीप्रिया च वय फक्त 35 वर्षांची होती.
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शांतीप्रिया एकटी पडली. तिने एकटीनेच दोन्ही मुलांचं संगोपन केलं. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शांतीप्रियाने अनेक धार्मिक सिरीयल्समध्ये देखील केल्या. माता की चौकी आणि द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण या मालिकांमध्ये तिने केलेले काम आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे. परंतु शांतीप्रियाला यश प्राप्त होऊ शकले नाही. सध्या शांतीप्रिया तमिळ चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये सपोर्टिंग रोल करत आहे.