शाहरुख खानने बॉलीवूड मध्ये २९ वर्षे नुकतीच पूर्ण केलीत. त्याचा पहिला चित्रपट ‘दीवाना’ २६ जून १९९२ रोजी प्रदर्शित झाला होता. शाहरुखच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत असे अनेक चित्रपट होते, जे इतर कलाकारांनी काही कारणास्तव सोडले. आणि त्याच भूमिका करत करत शाहरुख स्टारडमच्या शिडीवर चढून बॉलीवूडचा बादशहा झाला.

“दिवाना ” हा चित्रपट त्याच्या करिअरचा दुसरा चित्रपट असूनही शाहरुखसारख्या दिग्गजाची सुरुवात म्हणून ओळखला जाणारा वेगळा चित्रपट आहे. एक नवखा मुलगा ज्याला त्या काळातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट लेखक स्टार झाल्याची बातमी देतो. त्यात काहीतरी खास असणारच ना बॉस. ते जे खास होते, जे आतापर्यंत कायम आहे. ‘दीवाना’ चित्रपटाच्या काही अनोखे किस्से… खास आमच्या रसिकांसाठी

हिंदी सिनेमाची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी इंडस्ट्रीला 20 वर्षे दिल्यानंतर स्वत: साठी काहीतरी नवीन करणार होती. टीव्ही सीरियल ‘नुपूर’ दिग्दर्शित केल्यानंतर ती आपला पहिला चित्रपट बनवित होती. शूटिंग सुरू होणार होती. पण चित्रपटाच्या मुख्य नायकाचा शोध अद्याप सुरूच होता. त्याच वेळी हेमा टीव्ही शो ‘सर्कस’ मध्ये शाहरुखला दिसला. त्याला बोलावून तातडीने ऑडिशन घेण्यात आले. शेवटी शाहरुखचीच हिरो म्हणून निवड झाली. या चित्रपटाच्या शूटिंगला सतत विलंब होत होता.

याच दरम्यान, शाहरुखला ‘दिवाना’ मिळाला, ज्यामध्ये तो मध्यांतरानंतर दिसतो. यामध्ये ऋषी कपूर आणि दिव्या भारती मुख्य भूमिका करत होते. असे असूनही घाईघाईने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. ‘कोई ना कोई चाहिये’ हे गाणे शाहरुखच्या कारकिर्दीतील पहिले फिल्म शूट होते.

यापूर्वी ‘दिवाना’ चित्रपटात शाहरुखच्या रोलची ऑफर सर्वात आधी सनी देओल यांना देण्यात आली होती पण सनीने तो रोल करण्यास नकार दिला. यानंतर ती भूमिका प्रसिद्ध चित्रपट निर्माता राजकुमार कोहलीचा मुलगा अरमान कोहलीकडे गेली. तो हो म्हणाला. चित्रपटाच्या शुटिंगचे शेड्युल लागले होते. पण यावेळी अरमान व निर्मात्यांमध्ये क्रिएटिव्ह मतभेद झाले. आणि त्याने हा चित्रपट सोडला. यानंतर धर्मेंद्रने शाहरुखचे नाव आपल्या चुलतभावाला गुड्डू धनोवा जो की चित्रपटाचा निर्माता होता, त्याला सुचविले.

पुढे, आमिर खानने नाकारलेला “डर” आणि सलमान खानने नाकारलेला “बाजीगर” या सिनेमात काम केल्यानंतर शाहरुखची लोकप्रियता आणि फॅन फॉलोविंग तुफान वाढली आणि तो सुपरस्टार म्हणून ओळखला जाऊ लागला. शाहरुखने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की राकेश रोशनने त्याला या चित्रपटाच्या प्रगतीबद्दल माहिती दिली होती. पण सलीम-जावेद या सुप्रसिद्ध लेखक जोडीतील सलीम खान म्हणजेच सलमान खानचे वडील यांच्या मुखातून शाहरुख खान हा स्टार बनल्याबद्दल त्याला माहिती मिळाली.

शाहरुखने सांगितले की, जेव्हा तो सलमानच्या घरासमोरुन राकेश रोशनच्या भेटीला जात होता, तेव्हा सलीम खानने त्यांच्या घराच्या बाल्कनीत होते. त्याला आपल्या बाल्कनीतून हाक मारून थांबविले आणि सांगितले की, ”भाई तुम्हारी पिक्चर चल गई. मैं अभी नाई के यहां से आ रहा हूं, वहां कोई शाहरुख खान कट बाल कटाने आया था.” मग शाहरुखला समजलं की हो, आता खरंच त्याची फिल्म हिट झाली आहे आणि तो सुद्धा एक स्टार झाला आहे.

शाहरुखने आपल्या अनेक मुलाखतींमध्ये हे कबूल केले आहे की त्याने त्याचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट ‘दीवाना’ आजपर्यंत पाहिलाच नाही.मात्र, ‘दिवाना’ला २२ वर्षे पूर्ण झाल्यावर शाहरुखने त्याचा “दिवाना” चित्रपट न पाहण्याविषयी चर्चा केली. त्यांनी एक ट्विट केले, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांनी आजपर्यंत ‘दिवाना’ पाहिले नाही हे खरे आहे. आणि यामागील कारण असे आहे की तो त्याची पहिली आणि शेवटची निर्मिती पाहू इच्छित नाही.

नुकतेच २६ जून २०२१ रोजी शाहरुखने चित्रपटांमध्ये २९ वर्षे पूर्ण केलीत. या निमित्ताने त्यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिला फिल्म शॉट पुन्हा जगून घेतला. शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर स्लो मोशन व्हिडिओ पोस्ट केला. यात तो बाईक चालवताना दिसला असून पार्श्वभूमीवर त्याचे पहिले चित्रपटगीत सुरू आहे. कोई ना कोई चाहीये… प्यार करनेवाला…