जेव्हा शिष्य गुरूपेक्षा तरबेज बनतो …. शाहिद कपूर ऑन बॅटलफिल्ड

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वच तारे प्रत्येक अवार्ड्सच्या शोच्या दिमाखदार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात आणि आपल्या दमदार परफॉर्मन्स साठी सर्व कलाकार अगदी मनापासून तालीम करताना दिसतात. सोशलमीडिया च्या माध्यमातून प्रत्येक कलाकार आपापल्या सोशल नेटवर्किंग साईट्स वर आपल्या चाहत्यांना रंगीत तालिमीचे अपडेट्स देताना सध्या दिसत आहेत.

प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावर अनेक बड्या कलाकारांना एका अवॉर्ड सोहळ्यासाठी तयार करत आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा, कतरिना कैफ यांच्यासारखे अनेक बडे कलाकार सध्या त्यांच्या सोशल साईट्सवर शामकसोबतचेफोटोज अपलोड करत आहेत. शामकमुळे बॉलीवूड विश्वात अनेक कलाकार डान्स एक्सपर्ट म्हणूनही ओळखले जातात. तेव्हा सिद्धार्थ, कतरिना, भूमी पेडणेकर हे कलाकार शामकसोबत हा अवॉर्ड सोहळा एंजॉय करतानादिसत आहेत.

 मोस्ट हँडसम सेलिब्रिटी च्या यादीमध्ये मध्ये सर्वात अव्वल असलेला अभिनेता शाहिद कपूर सध्या चर्चेत आहे ते त्याच्या डान्स स्टेप्स मुळे … या अवार्ड्स च्या या तालीमीदरम्यान अभिनेता शाहिद कपूर आणिकोरिओग्राफर मर्जी यांच्यामध्ये स्टेजवरच “डान्स बॅटल” रंगली  आणि यामध्ये अर्थात शाहिदने बाजी मारली . या डान्स बॅटलचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे .

सुपरस्टार शाहिद कपूर हा कोरिओग्राफर शामक दावर यांच्या एकवर्षीय नृत्यप्रशिक्षण अभ्यासिकेचा विद्यार्थी होता आणि आपण पाहू शकतो की शाहिद आपल्या गुरूंकडून योग्य ती शिकवण घेऊन आपल्या गुरूपेक्षा तरबेजझाले आहेत .