पूर्वी आपल्याकडे श्रीमंतांचा रोग म्हणून ओळखला जाणारा मधुमेह आता अगदी सामान्य झाला आहे. आज भारतात जवळपास 50 मिलियन मधुमेहाचे रुग्ण आहेत. मधुमेहाचे 2 प्रकार आहेत. टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 मध्ये येणारा मधुमेह हा अंशतः किंवा पूर्णपणे इन्सुलिन तयार होत नसल्यामुळे होतो. अनुवांशिकतेमुळे होणारा हा मधुमेह वयाच्या विसाव्या वर्षाआधीच लक्षात येतो. हा मधुमेह रोखता येत नाही पण निरोगी आरोग्यशैलीने नियंत्रित करता येतो.
टाईप 2 मध्ये येणारा मधुमेह हा प्रामुख्याने आढळून येणारा मधुमेह आहे. चाळिशीनंतर ह्याची लक्षणे दिसू लागतात. इन्सुलिनची निर्मिती होऊन देखील शरीर योग्य प्रकारे प्रतिसाद देत नसल्याने हा मधुमेह होतो. स्थूलपणा, उच्च रक्तदाब, अपुरा आहार, ताण, हार्मोन्सचे असंतुलन मधुमेहाचे कारण बनू शकतात. मधुमेहासोबतच यकृत आणि किडनीशी निगडीत आजार, दृष्टिदोष ह्यांसारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. अशा वेळी काय कराल?
डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधे तर घ्यावी लागणारच पण त्याचबरोबर हे घरगुती उपाय देखील तुमच्यासाठी मधुमेहावर उपयुक्त ठरतील. साखर तुम्हाला साखर पूर्णपणे टाळणे शक्य नसेल तर साखरेचे प्रमाण कमी करा. शरीराला इतर घटकांप्रमाणेच साखर देखील आवश्यक आहे. परंतु आहारातील इतर पदार्थांपासून देखील ती पुरेशा प्रमाणात मिळते. साखर खाणार असाल तर तांदूळ, बटाटा ह्यांसारखे पॉलिसाकाराईड असलेले पदार्थ टाळा.
दारू : दारू शरीरासाठी हानिकारक आहे आपण सर्वच जाणतो. पण आता दारू पिणे ही समाजात आपले स्टेटस दाखवणारी गोष्ट बनली आहे. बिअर म्हणजे दारू नसते त्यामुळे तिचे सेवन चालते असाही गैरसमज असणारे बरेच लोक आहेत. बिअर मध्ये भरपूर प्रमाणात कार्ब्स असतात. हे यकृत आणि स्वादुपिंडाला नुकसानकारक आहेत. त्यामुळे इन्सुलिन निर्मितीवर परिणाम होतो.
दूध कदाचित हे वाचून तुम्हांला आश्चर्य वाटेल पण हो गायीचे दूध मधुमेहाच्या रुग्णांनी टाळावे. ह्याला पर्याय म्हणून आणि औषध म्हणून शेळी किंवा मेंढीच्या दुधाचे सेवन करावे. कोरफड ताक आणि कोरफडीच्या गराचे सेवन मधुमेहासाठी फायदेशीर आहे. कोरफडही अँटी-इन्फ्लामेट्री आहे.
ग्लूटेन टाळाग्लूटेन हे ऑटो-इम्युन डिसीजचे कारण बनते त्यामुळे ग्लूटेन असलेले धान्यटाळावे. व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी असणारी फळे-भाज्या ह्यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे. आवळा, संत्री ह्यांमध्ये व्हिटॅमिन सी असते. टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन सी तर असतेच शिवाय ह्यात कमी प्रमाणात कर्बोदके असतात.
पालेभाज्या पालेभाज्या रक्तातील ग्लुकोज कमी करण्यास व इन्सुलिचे प्रमाण वाढवण्यासमदत करतात. ह्यात व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. व्यायाम वाढलेले वजन हे मधुमेहाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा आहे. तुम्ही जिममध्ये जाऊनच व्यायाम करावा असे नाही. धावणे, चालणे, पोहणे, नृत्य ह्यामुळे देखील वजन कमी करण्यास मदत होते.
आहार आहारामध्ये मासे, अंडी, डाळी, मेथी ह्यांचा समावेश करा. पुरेशी झोप पुरेशी झोप ही शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. ताण-तणाव टाळून पुरेशी झोप शरीरासाठी फायदेशीर आहे.
Credit : भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)