‘पाणी’ म्हणजे जीवन. पाण्याशिवाय आयुष्य अशी कल्पना ही करता येत नाही. पिण्यासाठी पाणी योग्य पध्दतीने संधारीत करणे त्यासाठी उपाय करणे ह्याबद्दल आपण जाणतोच. पण काय तुम्हांला माहिती आहे का पाणी योग्य पद्धतीने कसे आणि का प्यावे? चला तर जाणून घेऊया. बरेच लोक तोंड न लावता गटागटा पाणी पितात.
बाहेर गेल्यावर स्वच्छतेच्या दृष्टीने हे योग्य आहे परंतु अशा पध्दतीने अजिबात पाणी पिऊ नये. वडिलधारी माणसं सांगतात त्याप्रमाणे पाण्याची चव घेऊन पाणी प्यावे म्हणजे प्रत्येक घोट हळूहळू प्यावा जेणेकरून दोन घोटांमधील अंतर योग्य राहिल. दोन घोटांमध्ये योग्य अंतर नसेल तर त्यात हवा अडकते ज्यामुळे पोट गच्च होते.
ज्याप्रमाणे पाणी चव घेऊन प्यावे त्याप्रमाणेच पाणी फोडून प्यावे. अर्थात असे पाणी ज्यात ऑक्सिजन जास्त असेल. वाहणाऱ्या पाण्यात ह्याचे प्रमाण अधिक आढळते कारण हे पाणी प्रत्येक दगडावर आपटते त्यामुळे त्यातील बॉंडिंग तुटून ताज्या प्राणवायूचे प्रमाण अधिक बसते. म्हणून तर वाहणारे पाणी हे साचलेल्या पाण्यापेक्षा अधिक चांगले असते.
प्रत्येकाने त्याच्या वजनाच्या अर्धे पाणी पिणे गरजेचे आहे. जर हे प्रमाण लक्षात येत नसेल तर साधारणतः किमान 8-10 ग्लास पाणी प्यावे. ह्याचा अर्थ असा नाही की 8-10 ग्लास पाणी प्यायचे आहे म्हणून कधीही प्यावे. जेव्हा शरीराची
पाण्यासाठी मागणी होते तेव्हाच पाणी प्यावे.
सकाळी उठल्यावर थोडेसे गरम पाणी प्यावे म्हणजे आतड्यांसंबंधीच्या हालचाली सुरळीत होण्यास मदत होते. फ्रिजमधील थंड पाणी शक्यतो टाळावे. ह्यामुळे पचनक्रिया मंदावते. चहा किंवा अन्य गरम पदार्थ खाण्याआधी किंवा लगेच खाल्यानंतर पाणी पिऊ नये. गार-गरम अशा एकामागून एक येणाऱ्या पदार्थांमुळे आतांड्यावर परिणाम होतो. जेवतानादेखील पाणी पिण्याची पद्धत आहे.
जेवनाआधी पाणी पिल्याने जठराग्नी मंदावते तर जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने कफ जास्त वाढून आम होतो, पचनक्रिये मध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे जेवणामध्ये थोड्या प्रमाणात फक्त घास सुलभरीतीने जाण्यासाठी मध्ये-मध्ये पाणी प्यावे. उभे राहून कधीही पाणी पिऊ नये. ह्यामुळे घुडघ्यांवर जोर पडतो आणि अर्थरिटीसचा धोका संभवतो. त्यामुळे नेहमी बसून शांतपणे पाणी प्यावे. अशाने स्नायू, तंतू, किडनी योग्य पध्दतीने काम करतात.
उन्हाळ्यामध्ये घामाद्वारे किंवा अतिसारामध्ये शरीराबाहेर पाणी जास्त प्रमाणात बाहेर टाकले जाते. अशावेळी शरीराला पाण्याची जास्त गरज असते त्यामुळे पाणी जास्त प्यावे. नेहमी तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे. असे पाणी अँटी-ऑक्सिडंट्सनी भरपूर व अँटी-कॅन्सर असते. व्यायामानंतर पुरेशा वेळेचा अवधी ठेवून पाणी प्यावे. कमी व्यायाम करून जास्त पाणी पिणे टाळावे. ह्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.
Credit : भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)