महेश मांजरेकरांच्या ‘FU’ सिनेमात आकाश ठोसर, पाहा फोटो
महेश मांजरेकरच्या FU म्हणजे Fun Unlimited या सिनेमात काम करत आहे. आकाशचे काही फोटो सोशल मीडियावर लिक होत आहेत.
‘माधुरी देसाई’ चे महेश मांजरेकरांच्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण.
सैराट सिनेमानंतर रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी प्रचंड प्रेम मिळालं. अगदी सामान्य कुटुंबातील या दोघांना आता अगदी बाऊन्सर घेऊन फिरण्याची वेळ आली. मराठी सिनेसृष्टीत हे सारे बदल अगदी पहिल्यांदा होताना दिसतात. रिंकू आणि आकाशची वाढती लोकप्रियता हे त्यांच्या उत्कृष्ठ कामाची पोचपावती आहे.
सैराट सिनेमानंतर रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचं आयुष्यचं बदलून गेलं. सैराटच्या भरभरून यशानंतर रिंकू राजगुरूला जाहिरातींमध्ये काम केली तर आकाश ठोसरला चक्क महेश मांजरेकरच्या FU म्हणजे Fun Unlimited या सिनेमात काम करत आहे. आकाशचे काही फोटो सोशल मीडियावर लिक होत आहेत.
आकाश ठोसर महेश मांजरेकर दिग्दर्शित FU या सिनेमात सत्या मांजरेकर सोबत स्क्रिन शेअर करताना दिसत आहे. सैराटच्या भरघोस यशानंतर आकाशला ही संधी चालून आली. पण या संधीसोबतच त्यांना त्याच्या खासगी आयुष्यात याचा फटका बसत आहे. आता रिंकू आणि आकाशला सामान्यांप्रमाणे फिरता येत नाही. आणि याचा फटका आकाशच्या दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगला होत आहे.
सिनेमाची शूटिंग महाराष्ट्राच्या विविध भागात सुरु आहे. परंतु चाहत्यांच्या गर्दीमुळे आकाशला प्रचंड पोलिस बंदोबस्तात राहावं लागत आहे. ‘FU’ च्या सेटवर आकाश आहे, याची कुणकुण लागू नये, याचा सर्वतोपरी प्रयत्न सिनेमाची टीम करत आहे. मात्र आकाश जिथे जातो, तिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी, त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची अलोट गर्दी लोटते. त्यामुळे आकाशसोबत शूटिंग करणं अतिशय अडचणीचं बनल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शक FU हा सिनेमा तरूणाईवर आधारित आहे. या सिनेमात चार मित्रांची गोष्टी आहे. महेश मांजरेकर सांगतात की सिनेमाच्या नावातच सर्वकाही आहे. सिनेमाचं नावंच सिनेमाची कथा उलघडत आहे.