ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

Sairat won 8 Awards in Maharashtracha Favourite Kon 2016 , Akash Thosar And Rinku Rajguru

सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री पुरस्काराचे मानकरी आकाश ठोसररिंकू राजगुरू ठरले.

Maharashtracha Favourite Kon ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्यात आपल्या कलाकृतीला कौतुकाची थाप मिळावी, असं सगळ्याचं कलाकारांना वाटतं. यंदाच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण? पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षक पसंतीची मोहोर ‘सैराट’ चित्रपटावर उमटली असून, सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री पुरस्काराचे मानकरी आकाश ठोसर व रिंकू राजगुरू ठरले. या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण रविवार १९ मार्चला सायंकाळी ७.०० वाजता झी टॅाकीजवर होणार आहे.


रसिकांनी नोंदवलेल्या सर्वाधिक मतांनुसार, फेवरेट दिग्दर्शक विभागात ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘सैराट’मधील ‘झिंगाट’ व ‘आताच बया का बावरलं’ या गाण्यांसाठी अजय – अतुल व श्रेया घोषाल यांना गौरवण्यात आलं. आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या दोघांनी नवोदित अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. फेवरेट स्टाईल आयकॉन म्हणून आकाश ठोसरला पुरस्कार देण्यात आला. ‘फेवरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ पुरस्कार अभिनेत्री रिंकू राजगुरूने पटकाविला तर सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी छाया कदम तसेच सहाय्यक अभिनेता पुरस्कारासाठी तानाजी गालगुंडे यांना प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळाली. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनेता सचिन पिळगांवकर यांना गौरवण्यात आले तर सर्वोत्कृष्ट गीताचा बहुमान ‘झिंगाट’ने पटकावला.

अभिनेता श्रेयस तळपदे, अमेय वाघचं खुसखुशीत निवेदन, सुखदा खांडकेकरने सादर केलेली ‘गणेशवंदना’, अतुल तोडणकर, अभिजीत चव्हाण, प्रियदर्शन जाधव, पुष्कर श्रोत्री, प्राजक्ता हनमघर, मेघना एरंडे, यांनी सादर केलेलं ‘शोकसभा’ हे प्रहसन, ‘फिल्मी फिल्मी’ धमाकेदार नाट्य, सई ताम्हणकर, रिंकू राजगुरू, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, मृणाल ठाकूर यांचे बहारदार नृत्य, आकाश ठोसर व वैभव तत्ववादी यांचा रॉकिंग डान्स, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे महेश मांजरेकर यांनी सांगितलेले भन्नाट किस्से असा मनोरंजनाचा भरगच्च नजराणा असलेला ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’चा हा सोहळा रविवार १९ मार्चला सायंकाळी ७.०० वाजता झी टॅाकीजवर प्रक्षेपित होणार आहे.