मित्रांनो! बॉलीवूडच्या या चंदेरी दुनियेत मुक्त, स्वच्छंद आणि खेळीमेळीचे वातावरण असते. सर्वांचे एकमेकांशी निकटचे संबंध असतात व त्यांच्या जवळीकीचा फार काही कोणी इश्यू करत नाही. परंतु कधीतरी अति पझेसिव्ह झाल्यामुळे काही वादविवादही घडतात… विसरलेही जातात.
तर असेच काहीसे घडले लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूरच्या बाबतीत. एकतर ती सतत चर्चेत असते . ती अनेकदा समोरच्याची बोलती बंद करते . तिला शक्यतो उलटे प्रश्न कोण विचारत नाही . चित्रपटाचा प्रश्न असो किंवा वैयक्तीक आयुष्याविषयी, करीनाला प्रत्येक उत्तर माहीत असते.
मागे एकदा ती ‘कि अँड का ‘ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात गेली होती . तेव्हा असेच काहीसे घडले होते. यावेळी तिला सैफ अली खानशी संबंधित एक प्रश्न विचारला होता. या चित्रपटात अर्जुन कपूर तिच्या हीरोची भूमिका साकारत असताना म्हणजे फिल्ममध्ये तो करिनाच्या नवऱ्याची भूमिका साकारत होता, तर करीना कपूर वर्किंग वूमनची भूमिका साकारत होती.
यावेळी तिला पती सैफशी संबंधील एक प्रश्न विचारला की, अर्जुन कपूर आणि सैफ अली खान यांच्यात उत्तम पती कोण होऊ शकेल? यावर तिने हसत हसत उत्तर दिले की, “अर्जुनला चित्रपटात इतकी मेहनत करताना पाहून , मी सैफला सोडून अर्जुनशीच लग्न कराव असं मला वाटते.” मात्र नंतर ती म्हणाली, “मुळात तुमचा प्रश्नच पूर्णपणे चुकीचा आहे . अर्जुन कपूर आणि सैफ अली खान यांच्यात कोणत्याही प्रकारे तुलना होऊ शकत नाही”
या चित्रपटाच्या वेळी अर्जुन कपूर रात्री उशिरा करीना कपूरला फोन करायचा अशीही बातमी मिळाली होती. अर्जुनचा करीनाला इतक्या उशिरा आलेला कॉल सैफला आवडत नव्हता आणि एकदा त्याला खूपच रागही आला होता . यामुळे त्याने याबाबत अर्जुनला देखील सुनावले होते कारण, त्याला हे उशिराने फोन करण्याचे प्रकरण बिलकुल आवडले नव्हते.
याबाबत एका प्रश्नाला उत्तर देताना सैफ म्हणाला होता की, “मी त्या दिवशी कॉल उचलला आणि अर्जुनला बोललो. मी त्याला सांगितले की, रात्री कॉल करण्याचे कारण कामाच्या बाबतीत असू शकते , परंतु आपण सकाळ होईपर्यंत थांबू शकत नाही का? प्रत्येकाला स्वतःची प्रायव्हसी असते की नाही?” असे म्हणत मी अर्जुनवर राग व्यक्त केला होता.
त्याला हे ही सुनावले होते की,”अर्जुन करीना फिल्म इंडस्ट्रीत तुझ्या पेक्षा जेष्ठ आहे , आणि तू तीच्या ज्येष्ठतेचा आदर केलाच पाहिजे. असेही सांगितले होते” या चित्रपटात अर्जुन आणि करीनाचे अनेक रोमँटिक सीन्स होते. यामुळे इंडस्ट्रीत सैफच्या करीना विषयीच्या अर्जुन विरुद्धच्या या आक्रमक पवित्र्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र बुकिंग विंडोवर या चित्रपटाने फार काही मोठी कमाई केली नाहीच. असो…