बर्‍याचदा उपवासाला आपण साबुदाणा खातो, पण साबुदाणा का खातात हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या ह्यामागील शास्त्रीय कारण.

साबुदाण्याला Tapioca sago म्हणूनही ओळखले जाते. Tapioca नावाच्या झाडाची मुळे ओली करून त्यावर दाब देऊन नंतर सुकविली जातात. ह्यामधून मोत्यासारखे जे गोल मिळतात त्याला साबुदाणा म्हणतात. साबुदाणा तयार करण्यासाठी चांगली वनस्पती निवडणे फार महत्वाचे आहे, यामुळे सौम्य किंवा अति-तीव्र विषारीपणाची समस्या उद्भवते. हा 358 KCal ऊर्जा, 88.7 ग्रॅम कार्ब आणि लो फॅटचा स्त्रोत आहे, म्हणून उपवासाला साबुदाणा खाल्ला जातो.

साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम सारखी रसायने असतात जे हाडांसाठी , उच्च रक्तदाब संतुलित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. तसेच हे वजन कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. साबुदाणा पचन-क्रिया, स्नायूंसाठी लागणारी  प्रथिने, आतड्यांमधील मायक्रोफ्लोरा वाढविण्यात मदत करते. परंतु पौष्टिकतेसाठी हा चांगला स्रोत नाही साबुदाण्यामध्ये आढळणारी साखर मधुमेह असणाऱ्या रूग्णांसाठी हानिकारक आहे.

-भक्ती संदिप

(Nutritionist in Foodvibes Grocers)