तांदूळ हा सर्व भारतीयांचा आवडता आहे. तांदूळ हा अन्नाबरोबरच आध्यात्मिक आणि औद्योगिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. तांदूळ हा दक्षिण भारतातील मुख्य अन्न आहे. पण तांदूळ म्हणजे काय ते माहित आहे का? ते का आणि कसा खातात हे तुम्ही जाणता का?
तांदळाचे वैज्ञानिक नाव Oryza sativa आहे. ह्यामध्ये 130 cal, 69% पाणी , 2.4 gm proteins, 28.7 gm carbs और 0.2 gm fat असते. तांदूळ नेहमीच एक वर्षापर्यंत जुना असावा. हाड तयार होण्यास असा तांदूळ महत्वाची भूमिका बजावतो. नवीन तांदूळ गोड आणि पौष्टिक असतो परंतु पचनासाठी हा त्रासदायक आहे.
तांदूळ नेहमीच धुवून किंवा भाजून खावा, असा तांदूळ पचनासाठी चांगला असतो. मांस, भाज्या, तेल, तूप, दूध, फळे, तेल घालून केलेला भात पचनासाठी थोडा कठीण होतो.
तांदूळ हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बहुतेकदा आपण पाहतो की मधुमेहाचे रुग्ण साखर खात नाहीत पण तांदूळ खातात. वास्तविक, साखर म्हणजे मोनोसेकराइड, म्हणजेच यात साखरेचा फक्त एक रेणू असतो आणि तांदूळ हा पॉलिसेकेराइड्सपासून म्हणजेच साखरेच्या अनेक रेणूंपासून बनलेला असतो. ह्याचाच अर्थ भात, बटाटे म्हणजेच पॉलिसेकेराइड्सपासून बनलेले हे पदार्थ टाइप 2 मधुमेह रूग्णांसाठी हानिकारक आहेत.
-भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)