“गॅंग्ज आॅफ वासेपुर” आठवतोय का? अर्थातच इतका प्रचंड गाजलेला चित्रपट कोणाला आठवणार नाही, एवढी जबरदस्त कास्टींग आणि त्या सर्वांची भारदस्त कलाकारी आपल्याला एका अनोख्या पद्धतीने पहायला मिळाली ती या चित्रपटात, ज्याचा दुसरा भागही तितकाच खास आणि रंजक ठरला.
तर ह्या चित्रपटात एका अभिनेत्रीने एक भुमिका वठवली होती आणि यातील एका बोल्ड दृश्याने तिची छाप प्रसारमाध्यमांमधे व प्रेक्षकांमधे उमटवली. ही अभिनेत्री म्हणजे, “रिमा सेन”. तर आज आम्ही तुम्हाला ह्याच अभिनेत्रीबद्दल थोडीशी माहिती देणार आहोत, ती सध्या काय करते?
काहीशा असा स्वरूपाच्या प्रश्नाच उत्तर देण्याचा हा अट्टाहास. थोडासा जुना पण विनोदात एक नंबर असा मालामाल विकली, त्यानंतर जाल- द ट्रॅप, व गॅंग्ज आॅफ वासेपुर मधे दमदार अभिनय करणाऱ्या या अभिनेत्रीला तिच्या उज्वल दिसणाऱ्या करियरला यशाने हुलकावणी दिली. आणि ती संसारात रमली.
दि. २९ आॅक्टोबर अर्थात कालच्या दिवशी रिमाचा वाढदिवस साजरा झाला. २९ आॅक्टोबर १९८१ रोजी कलकत्ता येथे रिमाचा जन्म झाला. काही काळ गेल्यावर तिने माॅडलींग क्षेत्रात आपलं नशीब आजमावायचा प्रयत्न केला आणि थोडेसे बंगाली सिनेमेही केले, बंगाली डेलीसोपमधेही तिला काम करण्याची संधी मिळाली आणि तिने तिही वठवली.
काही दिवस गेल्यावर रिमाने मुंबई गाठवी आपल्या कुटुंबासमवेत तिने मुंबईत पाऊल ठेवलं. मुंबई म्हणजे सिनेसृष्टीची खरी ताकद, आणि हे सार्थकी लागलं कारण तिला अनेक जाहिरातींसोबत तेलुगू सिनेमे आॅफर केल्या गेले त्यातही तिचा पहिला “चित्रम” हा तेलुगू सिनेमा सुपरहीट ठरला.
यानंतर गोष्ट वळली ती तिच्या बाॅलिवूड करियरकडे, आणि सुरू झाला उत्तुंग भरारीकडचा प्रवास. पण इथे गोष्टी थोड्याशा अपेक्षित समीकरणाप्रमाने न घडल्याने तिला बाॅलिवूडचा निरोप घ्यावा लागला आणि केवळ आठ सिनेमे करत तिने स्वत:ला थांबवले. हम हो गए आपके हा चित्रपटही तिने केला परंतु तो फ्लाॅप ठरला.
पुढे रिमाच्या वाट्याला केवळ सहाय्यक अभिनेत्रीच्याच भुमिका वाट्याला येत राहिल्या. यानंतरच्या काळात साधारण २००६ साली रिमा सेन एका बोल्ड फोटोशूटमुळे वादात अडकली. तिच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही काढल्या गेलं होतं. आणि याच प्रकरणात शिल्पा शेट्टीचही नाव होतं.
त्यानंतर मात्र अनेक दिवसांनी रिमा दिसली ती केवळ गॅंग्ज आॅफ वासेपुर च्या दुसर्या भागात जो सिनेमा २०१२ साली प्रदर्शित झाला. या सिनेमाने तिला बरचसं प्रकाशझोतात आणून सोडलं ते तिच्या बोल्ड सिनच्या चर्चांनी. परंतु हे सर्व काही सोडून आज ती एक विवाहित आयुष्य जगते आहे. शिवकरण सिंग या बिझनेसमॅन सोबत तिने लग्न केलं आहे, आता तिला एक मुलगादेखील आहे.