सध्या स्टार प्रवाह वहिनीवरील एक मालिका प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडत आहे. टीआरपी च्या बाबत ही ती मालिका सध्या आघाडीची भूमिका बजावत आहेत. त्या मालिकेत एका नवीन अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. त्या लोकप्रिय मालिकेचं नाव आहे, ” रंग माझा वेगळा “…

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. प्रत्येक एपिसोड मध्ये काही न काही तरी टर्न येतच राहतो. आणि पुढचा एपिसोड पाहूच वाटतो, अशी सध्या मालिका चाललेली आहे.

अशातच आता या मालिकेत अभिज्ञा भावेची एन्ट्री होणार आहे. तनुजा भारद्वाज असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तनुजाच्या येण्याने कथानकातही नवं वळण येणार आहे. ज्यामुळे मालिका प्रेक्षकांना अजून खेळवून ठेवण्यात यशस्वी होऊ शकेल.

अभिज्ञा भावे ही अभिनेत्री गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या माध्यमांत काम करते आहे. तिने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत सुरुवात करून काम सुरू केलेलं आहे. आधी ती नाटकात होती. त्यातून पुढे ती मालिकेत आली.

सुबोध भावेच्या ‘तुला पाहते रे’ मालिकेत तिच्या कामाची तारीफ झाली. पुढे तिने पुन्हा एकदा नाटक केलं. त्यात सुनील बर्वे, मयुरी देशमुख यांच्या भूमिका होत्या. त्या नाटकाचं नाव होतं ‘तिसरे बादशाह हम’. आता अभिज्ञा पुन्हा एकदा टीव्हीवर यायला सज्ज झाली आहे.

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. लवकरच या मालिकेत अभिज्ञा भावेची एन्ट्री होणार आहे. तनुजा भारद्वाज असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तनुजाच्या येण्याने कथानकातही नवं वळण येणार आहे.

कार्तिक आणि तनुजा कॉलेज फ्रेण्ड्स. मात्र कॉलेजनंतर या दोघांची भेट कधी झाली नाही. आता मात्र एका अपघातानेच या दोघांची भेट घडवून आणली आहे. तनुजाच्या येण्याने मालिकेच्या कथानकात कोणता नवा ट्विस्ट येणार हे पहाणं देखिल उत्सुकतेचं असणार आहे.