पुणे येथे ‘भाग्यलक्ष्मी’ नावाची दूध डेअरी सुरू आहे, ज्यात ग्राहकांच्या यादीमध्ये मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींची नावे आहेत. अंबानी कुटुंब ते अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, हृतिक रोशन अशा सेलेब्रिटींच्या घरी या डेअरी चे दूध जाते. हि डेअरी अगदी उच्च तंत्रज्ञानानी परिपूर्ण आहे, या डेअरी चा मालक देशातील सर्वात श्रीमंत डेअरी मालक आहे.
या दुग्धशाळेचे मालक देवेंद्र शाह आहेत. ते या व्यवसायात येण्याअगदोर कपड्यांचा व्यवसाय करायचे. त्यानंतर त्यांनी दुग्धशाळेचा व्यवसाय चालू केला. देवेंद्र शहा यांनी 175 ग्राहकांसह ‘प्राईड ऑफ काऊ’ प्रॉडक्ट ची सुरुवात केली, आज त्याच्याकडे अनेक मोठ मोठ्या सेलिब्रिटीं आणि पुणे येथे 22 हजाराहून अधिक ग्राहक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शाह यांच्या दुग्धशाळेत 2,000 हून अधिक डच होलस्टाईन गायी आहेत. प्रत्येक गायीची किंमत 90 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे. या 26 एकरांवर बनविलेल्या डेअरी फॉर्मवर दररोज 25 हजार लिटरपेक्षा जास्त दूध तयार होते.
आपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की येथे दूध काढताना गाय रोटरीमध्येच राहते, तोपर्यंत आधुनिक जर्मन मशीनसह गायीची मालिश केली जाते. या डेअरीतील गायींसाठी ठेवलेले रबर मॅट दिवसातून 3 वेळा स्वच्छ केले जातात. त्याचबरोबर येथील गायी फक्त आरओचे पाणी पितात. या व्यतिरिक्त, या डेअरीमध्ये 24 तास संगीत चालू असते. तसेच या गायींना सोयाबीन, अल्फा गवत, हंगामी भाज्या आणि मका हे खाद्य दिले जाते.
येथे गायीचे दूध काढण्यापासून ते बाटलीमध्ये भरेपर्यंतचे सर्व काम स्वयंचलित आहे. या व्यतिरिक्त, दूध काढण्यापूर्वी प्रत्येक गायीचे वजन आणि तपमान तपासले जाते. जर गाय आजारी असेल तर तीला थेट रुग्णालयात पाठविले जाते. दुध पाईप्सद्वारे सायलोग मध्ये आणि नंतर पॉश्चुराइज्ड करून बॉटल्स मध्ये सील केले जाते. एका वेळी 50 गायींचे दूध काढले जाते. ज्यास सात मिनिटे लागतात.
शाहची मुलगी आणि कंपनीची मार्केटिंग हेड अक्षाली शाह म्हणते की दररोज १33 किलोमीटर प्रवास करून फ्रीझिंग डिलीव्हरी व्हॅनमधून दूध साडेतीन तासांत मुंबईत पोचते. डिलिव्हरी मॅन सकाळी 5.30 ते 7.30 च्या दरम्यान ग्राहकांना दूध वितरीत करतो. काही वेळेस पुण्याचा ग्राहक मुंबईत किंवा मुंबईचा ग्राहक पुण्यामध्ये दूध मागतो तेंव्हा हि दूध देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
प्रत्येक ग्राहकाकडे ‘प्राईड ऑफ काऊ’ साठी लॉगिन आयडी असतो. ज्यावर तो ऑर्डर बदलू किंवा रद्द करू शकतो. डिलिव्हरी चा वेळ हि बदलू शकतो, आणि या दूध डेअरीतील दुधाची किंमत फक्त ९० रुपये आहे
2013 मध्ये डेयरी मार्केटची किंमत बाजारपेठेची सुमारे 70 दशलक्ष डॉलर्स (4,54,335 कोटी रुपये) होती आणि इन्व्हेस्टर रिलेशन्स सोसायटीच्या (आयआरएस) अहवालानुसार २०२० पर्यंत भारतातील दुग्ध बाजार 140 अब्ज डॉलर्स (9,08,670 कोटी रुपये) ओलांडेल.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.