आली तर आली नाहीतर गेली उडत ! या गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर प्रवीण जाधव यांचे अनेक गाणे आलेत. पण कोरोना काळात सगळ्यांना शांत बसावं लागलं त्याच वेळी पुण्यात राहणारे प्रवीण जाधव गावी आले आणि त्यांनी आपल्या गावाकडील कलाकारांना घेऊन 2 म्युझिक व्हिडिओ पूर्ण केलेत ज्यातील एक आहे, इश्कान ठासली ज्याची निर्मिती पुण्यातील जाधवर फिल्म्स ने केली आहे. तसेच दुसरं गाणं आहे तुझ्या रूपान ज्याची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रोडकशन ने केली आहे. दोन्ही गाणी आपल्या परिसरात म्हणजे पिंपळगाव हरेश्वर, मनूदेवी,मुर्डेश्वर व सोयगाव जवळील वाडीचा किल्ला इथं चित्रित केली आहेत ही दोन्ही गाणी याच महिन्यात प्रदर्शित होणार आहेत, विशेष म्हणजे या दोन्ही गाण्याला आवाज लाभलाय तो महाराष्ट्राचे महागायक आदर्श शिंदे यांचा आणि शुभांगी केदार हिचा. या दोन्ही गाण्यांना कॅमरा पुढचे व मागचे दोन्ही कलाकार हे जळगावचेच आहेत हे विशेष.

नुकतंच कहर नावाच्या गाण्याचं शूट पूर्ण करून प्रवीण जाधव जळगावला आलेत व इथं ते

“नवरा पाहिजे JCB वाला ” आणि साईधनं फिल्म्सच ” “बघतेस काय रागानं ”

ही गाणं लवकरच चित्रित करत आहेत. तर लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील संगीत प्रेमी ना ही खुश खबर आहे कि आदर्श शिंदे यांनी गायिलेली प्रवीण जाधव यांनी लिहिलेली संगीतबद्ध केलेली आपल्या भागात चित्रित झालेली गाणी लवकरच येणार आहे. प्रतीक्षा आता संपलेली आहे. अशी माहिती साईधन फिल्म्स चे सर्वोसर्वा धनंजय कीर्तने यांनी दिली!