मित्रांनो!, जे आंबटशौकीन प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी अभिनेत्री पूनम पांडे हे नाव काही नवीन नाहीय. पूनम सतत तिच्या बोल्ड फोटो व व्हिडीओमुळे चर्चेत असते. पण आता ती राज कुंद्रा प्रकरणामुळे चर्चेत आहे. होय, राज कुंद्राला पो’र्नो’ग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर पूनम पांडे व शर्लिन चोपड़ा या दोघींची चर्चा होतेय. या दोघींसोबत राज कुंद्राने करार केला होता. आता या प्रकरणाच्या निमित्ताने पूनमचा न्यूडिटीवरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात ती न्यूडिटीवर भरभरून बोलताना दिसतेय.
“न्यूडिटी ही एक कला आहे. याकडे कला याच दृष्टिकोनातून पाहिले गेले पाहिजे”, असे ती म्हणतेय. राज कुंद्राच्या अॅपवरचे व्हिडीओ पॉ’र्न या श्रेणीत येत नसून इरोटिका म्हणजेच न्यूडिटीच्या श्रेणीत येतात, असा अनेकांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर पूनमचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. ‘गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी मला फोन आणि मेसेज करून पॉ’र्नो’ग्राफी आणि इरॉटिकातील फरक विचारला. मला फार काही ज्ञान नाही. पण मला न्यूडिटीचा अर्थ माहित आहे.
कारण मी न्यूड फोटोशूट केले आहेत,’ असे ती व्हिडीओत म्हणतेय. पुस्तकाच्या दुकानातून तुम्ही कामसूत्र पुस्तक विकत घेऊ शकतो. 70 च्या एम एफ हुसैन यांनी अनेक न्यूड चित्र काढली आहेत. आपल्याकडे अशी अनेक सुंदर मंदिर आहेत. तिथल्या न’ग्न मूर्ती तुम्ही पाहा. ही सर्व एक सुंदर कला आहे. न्यूडिटीकडे कला म्हणून पाहिले गेले पाहिजे, असे तिने म्हटलेय.
न्यूडिटी एक कला आहे आणि हीच कला आमच्या सिनेमातही दिसते. न्यूडिटी एक कला म्हणून दाखवली जाते. मी तरी याबद्दल हाच विचार करते, असेही तिने म्हटले आहे. पूनमने मॉडेलिंग क्षेत्रातून करिअरची सुरूवात केली होती. 2013 साली नशा या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
पो’र्नो’ग्राफिक कंटेट प्रकरणी उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अ’ट’क झाल्यानंतर या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. राज कुंद्राविरोधात याआधी देखील मॉडेल पूनम पांडे हिनं हायकोर्टात धाव घेतली होती. पण आता कुंद्राच्या अटकेनंतर पूनम पांडेनं केलेल्या आरोपांबाबत अधिक माहिती आता समोर येऊ लागली आहे.
याशिवाय, पूनम पांडे हिनं इतर पीडित मुलींनी देखील पुढे येऊन त्यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती जाहीर करावी, असं आवाहन केलं आहे. “तुम्ही विचार करा मला समाजमाध्यमांमध्ये अनेक लोक ओळखतात. माझ्यासोबत जर असं घडलं असेल तर या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहणाऱ्या नवख्या मुलींसोबत काय काय घडलं असेल. हे कधी आणि कसं थांबणार आहे? हे मला माहित नाही. पण ज्या ज्या मुलींसोबत वाईट घडलं आहे त्यांनी समोर येऊन बोलायला हवं असं आवाहन मी करते”, असं पूनम पांडे म्हणाली.