धम्माल मस्तीत रंगला ‘वन डे विथ लाल इश्क’

One Day With Laal Ishq Team

 

 

भन्साळी हे नाव उच्चारले तर त्यात भव्यता आणि वेगळेपण हे आलेच! हीच भव्यता आणि वेगळेपण मराठीतही अनुभवायला मिळणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध असणा-या संजय लीला भन्साळी यांच्या प्रत्येक सिनेमाची प्रदर्शानापुर्वीची प्रसिद्धीदेखील तितकीच हटके असते. मराठीतील त्यांच्या आगामी ‘लाल इश्क’ या सिनेमाची देखील अशाच वेगळ्या ढंगात पूर्वप्रसिद्धी करण्यात आली. लोणावळा येथील सुप्रसिद्ध डेला रिसोर्टमध्ये महाराष्ट्रातील सर्व सिनेपत्रकारांसोबत ‘वन डे विथ लाल इश्क’ सेलिब्रेशनची भन्नाट संकल्पना भन्साळी प्रॉडक्शनने यशस्वीरित्या राबवली. विशेष म्हणजे, अशाप्रकारे मराठीत सिनेकलाकारांसोबत संपूर्ण दिवस घालवण्याचा हा पहिलाच उपक्रम असून, ‘लाल इश्क’ या सिनेमाच्या निमित्ताने हा हटके उपक्रम पत्रकारांना अनुभवायला मिळाला.  

 

Laal Ishq Team1

 

 

या आगळ्यावेगळ्या ‘वन डे’ सेलिब्रेशन मुळे ‘लाल इश्क’ च्या सर्व कलाकारांना मोठे ग्लॅमर तर प्राप्त झालेच पण त्यासोबतच केवळ बातमीसाठी आणि मुलाखतीसाठी संपर्कात आलेल्या महाराष्ट्रातील सिने पत्रकारांसोबत एक दिवस फक्त धम्माल मस्ती करण्याची नामी संधी देखील त्यांना मिळाली. दरम्यान, चित्रपटातील सर्व कलाकारांनी आपल्या हटके अंदाजात सिनेमातील आपल्या भूमिकेविषयी सांगताना एका सुंदर नाटकाचे सादरीकरण करत सिनेमातील कथानकाशी पत्रकारांचा परिचय करून दिला. त्यासाठी समिधा गुरुने प्रथम नाटकाला सुरुवात करताना चित्रपटातील तिच्या इन्स्पेक्टर निंबाळकर या भूमिकेतील पात्र पत्रकारांसमोर सादर केले. तिला कमलेश सावंत यांनी साथ देत सिनेमातील इन्स्पेक्टर अजिंक्य रणदिवेची भूमिका करत सिनेमाची प्राथमिक कथा समोर मांडली. एका हॉटेलमध्ये नाटकाची टीम गेली असून, तिथे एका अपरिचित व्यक्तीचा खून होतो अशी ‘लाल इश्क’ या सिनेमाची प्राथमिक कथा आहे. या खुनाच्या शोधात निघालेली हि दोघे त्यानंतर सिनेमातील प्रत्येक पात्राला आरोपीच्या पिंज-यात उभे करत कलाकारांचा परिचय करून देतात. त्यावेळी त्यांना सर्वप्रथम हॉटेलचा कुक सनी(उदय टिकेकर), अभिनेत्री निशा (यशश्री मसुरकर), श्रेया (स्नेह चव्हाण), गणेश(फर्जील पेरडीवाला), विनय ( पियुष रानडे), नाटकाचा निर्माता पोतदार (जयवंत वाडकर), हॉटेल ची मेनेजर जानवी ( अंजना सुखानी) आणि नाटकाचा अभिनेता यश पटवर्धन (स्वप्नील जोशी) अशी सर्व पात्र भेटतात.  हि सर्व पात्र  आपली बाजू मांडत आपण कसे निर्दोष आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. सिनेमाच्या सर्व कलाकारांनी सादर केलेल्या या एक्टचा सिनेपत्रकारांनी पुरेपूर आनंद लुटला. शिवाय चित्रपटातील ‘चिमणी चिमणी’ या गाण्याच्या लाईव्ह सादरीकरणामुळे पार्टीत आणखीनच रंगात आली. विशेष म्हणजे यानिमित्ताने सर्वांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी याचा सुरेल आवाज त्याने प्रथमच गायलेल्या या गाण्यामुळे ऐकायला मिळाला. तसेच पियुष रानडे, स्नेहा चव्हाण, जयवंत वाडकर, आरती केळकर, कस्तुरी वावरे आणि खुद्द अमितराज यानेही गाणे गात ठेका धरला. 

 

One Day With Laal Isha Team

 

मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यतून थोडा उसंत मिळण्यासाठी पत्रकारांसोबत खेळ आणि मज्जा मस्ती करत लाल इश्क च्या सर्व कलाकारांनी ख-या अर्थाने ‘वन डे विथ लाल इश्क’ साजरा केला. आपल्या आवडत्या कलाकारांसोबत संपूर्ण एक दिवस घालवण्याची नामी संधी सिनेपत्रकारांनी पुरेपूर लुटली. पियुष रानडे, अमित राज, कमलेश सावंत आणि स्नेहा चव्हाण या कलाकारांनी पत्रकारांसोबत स्नूकरचा आनंद लुटला. तर स्वप्नील आणि अंजना या सिनेमाच्या जोडगोळीने रिसोर्टच्या बागेत काही पत्रकारांसोबत गप्पा मारल्या.

One Day With Laal Isha

 

सिनेमाच्या सादरीकरणात भव्यता आणण्यासाठी शबिना खान यांच्या दर्जेदार संकल्पनेचा फायदा झाला. लाल इश्क या चित्रपटात त्यांनी सह्निर्मितीसोबतच वेशभूषा करांची भूमिका देखील बजावली आहे. त्यासाठी चित्रपटाच्या चीत्रीकरणापासून ते अगदी प्रसिद्धीपर्यंत त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. सिने पत्रकारांसोबत नुकताच झालेल्या लाल इश्क सिनेमाच्या या वन डे सेलिब्रेशनची हि संकल्पना त्यांनींच आखली होती.  

स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित या सिनेमाची पटकथा व संवाद शिरीष लाटकर यांचे असून अमितराज, निलेश मोहरीड या दोघांनी मिळून या सिनेमाला संगीत दिले आहे. हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात २७ में रोजी प्रदर्शित होत आहे. लाल इश्क़ हा मराठी सिनेमांमधला सर्वात उत्सुकता वाढवणारा चित्रपट ठरेल, यात शंका नाही.
Kamlesh Sawant
Jayant Wadkar
Amit Sawant
Swwapnil Joshi&Anjana Sukhani

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here