Neha Mahjan Exclusive Interview With starmarathi.in

नेहा महाजनचे अंतरंग उलगडताना…..

.चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा प्रवास कसा होता ?

तळेगावात मी सतार वाजवायला शिकत आहे. मी फर्ग्युसन कॉलेजमधून B.A व   M.A केल. अक्टिंगबद्दल आवड होती .मला कलेविषयी  प्रेम व आदर होता. जे  जे काम मिळत गेलं ते काम मी मनापासून करत गेले.

२. चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली ?

एक नाटक पाहायला गेले होते. तेव्हा सुमित्रा मावशी आणि सुनील सुकटणकर होते . नाटक बघताना एवढा परिणाम होत होता की सुमित्रा मावशीने मला विचारल काय  करतेस ? मला उद्या भेटायला ये. सुमित्रा मावशींसोबतचा १७  व्या वर्षी  केलेला देवसबारीस हा माझा पहिला चित्रपट होता.

३ . आगामी चित्रपट कोणता ?

माझे ३ नवीन चित्रपट येतायत. TTM, महेश मांजरेकरांसोबत आहे व तसेच हिंदी नवीन चित्रपट येतोय हिंदी कथा माझ्यासोबत फिरते त्या चित्रपटच नाव आहे ‘गा’.  हा चित्रपट आधी कॅनडा मध्ये प्रसिद्ध होणार आहे . जानेवारीपर्यंत मुंबईत पण प्रदर्शित होईल .

Neha Mahajan Watch Royal Photoshoo

४. बोल्ड सीन बाबत तुझ मत काय आहे ?

बोल्ड सीन म्हणजे नीळकंठ मास्तर मध्ये हाताने काच फोडणे पण मला बोल्ड वाटतो. समाजाच्या अपेक्षांच्या बाहेर जावून एखादी गोष्ट केली कि ती बोल्ड असते. आपण आपल्या विचाराने जग समजायला हव.

५. चित्रपटसृष्टीत काम करताना आठवणीत राहिलेली एखादी घटना कोणती ?

दिपा मेहताने दिग्दर्शित  मिड नाईट चिल्ड्रन हा इंग्लिश चित्रपटात मी काम केलं होत , सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत १० दिवस कार्यशाळेत सहभागी होता आलं.  त्यात  शबाना आझमी, अनुपम खैर, राहुल पोल सगळ्यांसोबत मला काम करायला मिळाल . अक्टिंग शिकणं, सिनेमाबद्दल बोलणं हे सगळे खूपच अविस्मरणीय होतं.  त्यात मी शबाना आझमी यांची तरुणपणाची भूमिका करत होती. त्यामुळे  त्यांच्या सोबत मला जास्त वेळ घालवता आला.

६. ग्लँमर म्हणजे काय ?नटापटा म्हणजे दिसणं म्हणजे ग्लँमर नव्हे. आपल्या विचारांनी भावनांनी आणि आपण किती आपलं काम झोकून करतो त्याला ग्लँमर म्हणता येईल.

७. पुस्तक कोणतं आवडत ?वाचन करायला खूप आवडत.गेल्या ४ महिन्यात मी महाभारताचे सगळे खंड वाचून काढलेत.