नवरात्रीनिमित्त महिला कीर्तनकार स्पेशल : देवाचिये द्वारी…कीर्तनाची वारी – डोळ्यात अंजन घालताना रंजन करणारी कीर्तने
सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते || अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र सुरू होते. यानिमित्त आदिशक्ती दुर्गाची नऊ दिवस नऊ रूपांमधून पूजा केली जाते. अशा भक्तिपूर्ण वातावरणात नवरात्रीनिमित्त फक्त मराठी मराठी वाहिनी एक खास कीर्तन मालिका घेऊन येत आहे ज्याचे नाव आहे ‘महिला किर्तनकार विशेष:देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’. तमाम भक्त मंडळी २९ सप्टेंबर ते ८ऑक्टोबर रोज सकाळी ७.३० वाजता या रसाळ कीर्तन मालिकेचा आनंद घेऊ शकतील.
नवरात्र काळात देवी मंदिरांमध्ये विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येते. यात अर्थातच कीर्तने आलीत. अनादी निर्गुणचा जागर करणारा हा उत्सव असल्याने फक्त मराठी वाहिनीनेसुद्धा खास महिला कीर्तनकारांची कीर्तने दाखवण्याचे ठरवले आहे. नवरात्रीमध्ये ह.भ.प ज्ञानेश्वरीताई पवार, ह.भ.प देवयानीताई इकडे, जयश्रीताई तिकांडे, अंजलीताई शिंदे, कांचनताई जगताप अशा महिला कीर्तनकारांची कीर्तने प्रेक्षकांना बघायला मिळतील. तर बघायला विसरू नका ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’ रोज सकाळी ७.३०वाजता फक्त मराठीवर!