Upcomig Marathi Movie ‘ Muramba ‘ Release date ,Cast ,Wiki, Actor, Actress ,Photos

आठवणींच्या मुरांब्याची गोडी वाढवणारे ‘मुरांबा’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित’

‘मुरांबा’ Muramba आता तुम्ही विचार कराल नक्की भानगड काय आहे. आम्ही सुद्धा नाव वाचलं तेव्हा आमचं ही काही असच झालं...

मराठी सिनेसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवर हात घातला जात आहे. सिनेमांच्या नावाचं म्हणाल तर भन्नाट नावं आजकाल सिनेमांना दिली जात आहे. मराठी सिनेमांच्या कथा, पटकथा, संवाद, सिनेमॅटोग्राफी याकडे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

नुकतंच रंजीत गुगले यांनी सोशल मिडियावर ‘मुरंबा’ या सिनेमाचे नवं कोर पोस्टर प्रदर्शित केले आहे. ‘घंटा’ Ghantaa चित्रपटाच्या यशानंतर दशमी स्टुडियोज ‘मुरांबा’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनोरंजक चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तसेच त्यांच्यासह हयुज प्रॉडक्शन्स, प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत हा नवा कोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

पोस्टर पाहिलं तर नक्की या सिनेमात काय आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. या सिनेमाची कथा आणि दिग्दर्शनाची धुरा वरूण नार्वेकर यांनी सांभाळली आहे. हा आता या सिनेमात कलाकार कोण आहेत, ते कोणते पात्र साकारणार आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.