mumbai-railway-police-utsav-2016




Mumbai Railway Police Utsav (2016) In Devendra Fadnavis Chief Minister of Maharashtra

कलर्स मराठी प्रस्तुत लोहमार्ग, मुंबई पोलीस दिवाळी मेळावा
उत्सव २०१६ – संगीत रजनी

दिपावली सणानिमीत्त मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालय व कलर्स मराठी colors marathi वाहिनी
यांचे सयुंक्त विद्यमाने निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवर
अतिथी आणि रेल्वे पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांसाठी गुरुवार दिनांक २७ ऑक्टोबर, २०१६
रोजी   उत्सव -२०१६ संगीत रजनी कार्यक्रम पोलीस परेड ग्राउंड,रेल्वे पोलीस मुख्यालय,
घाटकोपर,पंतनगर, घाटकोपर(पुर्व) मुंबई – ४०० ०७५ येथे पार पाडला.

mumbai-railway-police-utsav




मुंबापुरीच्या रक्षणासाठी नेहेमीच पोलीस विभाग सदैव सतर्क असतो, मग ते लोहमार्ग पोलीस असो वा
अन्य विभाग. कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन चोखरीत्या पार पाडले जात आहे कि नाही याच्यावर
त्यांचे कटाक्षाने नियंत्रण असते. याच आपल्या लोहमार्ग मुंबई पोलीसांच्या सन्मानाखातर आणि हे सगळे
पोलीस अधिकारी आपल्यासाठी करत असलेल्या मौल्यवान कार्यासाठी कलर्स मराठीने त्यांना एक
मानवंदना देण्यासाठी वा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळी मेळावा म्हणजेच “उत्सव २०१६ Usav 2016 – संगीत
रजनी” याचे मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालय आणि कलर्स मराठी यांच्या सयुंक्त विद्यमाने नियोजन
करण्यात आले. या सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते.

devendra-fadnavis-kirit-somaiya-sathish-mathur-anuj-poddar

 

कार्यक्रमासाठी मा. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. प्रकाश मेहता गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. दिपक केसरकर, गृह
( ग्रामीण), वित्त व नियोजन, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. किरीट सोमय्या, खासदार, मुलुंड, मुंबई, मा. सतीश
माथुर, पोलीस महांसचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई , मा डी कनकरत्न्म, अप्पर पोलीस महांसचालक, लोहमार्ग,
महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेसह महाराष्ट्र पोलीस दलातील, बृहन्मुंबई महानगरपालीका, मंत्रालय मुंबई येथील
मान्यवर वरिष्ठ अधिकारी आणि कलर्स मराठी वाहिनीचे प्रमुख अनुज पोद्दार व रोटरी क्लब, मुंबई यांचे
पदाधिकारी उपस्थित होते.

mumbai-railway-police-utsav-2016

 

हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीवर बघायला मिळणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन
रुपाली अंबुरे, पोलीस उपआयुक्त( मध्य ), दिपक देवराज, पोलीस उपाआयुक्त( पश्चिम) लोहमार्ग मुंबई
आणि कलर्स मराठी वाहिनीचे कार्यकर्ते यांनी पाडले.

devendra-fadnavis-anuj-poddar

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here