मराठी सिनेसृष्टीतील नवोदित अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेने नुकतंच सोशल मीडियावर अभिनेता परेश रावल सोबत एक छान सेल्फी तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे आणि त्या सेल्फीला तिने डियर फादरअसं कॅप्शन दिलंय. तिच्या या कॅप्शनने बरेच चाहते मात्र गोंधळले. मृण्मयी अभिनेता परेश रावल सोबतएका गुजराती नाटकात अभिनय करतेय आणि त्या नाटकाचं नाव ‘डियर फादर’ असं आहे. या नाटकाचेजवळ जवळ ५०० प्रयोग झाले असून या नाटकासाठी मृण्मयीने भारतभर तसंच USA, लंडन, दुबई, सिंगापुर,नैरोबी या ठिकाणी दौरे केले. मृण्मयी या नाटकात परेश रावल यांच्या सुनेची भूमिका सादर करतेय आणितिच्या नाटकातील फादर-इन-लॉ सोबत एक कूल सेल्फी तिने तिच्या लाडक्या चाहत्यांसाठी शेअर केलाआहे. या फोटो इतकीच या दोघांची ऑन स्टेज केमिस्ट्री पण तितकीच चांगली असेल यात शंकाच नाही.