Mi Tujha Parshya Tu Majhi Aarchi | Marathi Hit roadshow song 2016 | Sumeet Music
Music: Chandan Kamble, Singer/Lyrics: Ajay Shirsagar
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.

 

मी तुझा परश्या गं, तू माझी आरची (व्हिडिओ)

‘मी तुझा परश्या ग, तू माझी आरची’ सुमित म्युझिकचं हे नव गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतंय. दिग्दर्शक नागराज मंजुळेचा सैराट सिनेमाने अवघ्या महाराष्ट्राला वेडं लावलं. बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रेकॉर्ड मोडलाच मात्र त्याचबरोबर प्रेक्षकांना सिटवरून उठवून थिएटरमध्ये बेफाम नाचायला लावलं. सैराटमधील लोकप्रिय पात्र ज्यांची प्रेमकथा संपूर्ण जगाने अनुभवली अशा आर्ची आणि परश्याची जोडी अतिशय गाजली. या जोडगोळीवर अजय क्षिरसागर यांनी गाणं लिहून चंदन कांबळे यांनी संगीत देऊन ”मी तुझा परश्या ग, तू माझी आरची” हे गाणं तयार केलं आहे.

Mi Tujha Parshya Tu Majhi Aarchi Free Download

या गाण्यामध्ये आर्ची आणि परश्याची लव्हस्टोरी सांगितली आहे. अगदी हे गाणं ऐकताना तुमच्यासमोर सैराट सिनेमातील अनेक सिन डोळ्यासमोर येतात. अगदी आर्ची ट्रॅक्टर घेऊन थेट….. शेतात जाताना देखील तुम्हाला दिसेल. तसेच परश्याने आपलं प्रेम वक्त करण्यासाठी त्या लहान मुलाकडे जो चिठ्ठीचा सिलसिला सुरू केला अगदी तो ही या गाण्यात मांडण्यात आला आहे.
आपण पाहिलं २९ एप्रिलला प्रदर्शति झालेल्या सैराटची झिंग काही कमी होता होत नाही. ती नशा प्रेक्षकांवर चढतच आहे.

Mi Tujha Parshya Tu Majhi Aarchi Marathi Hit roadshow song

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here