बार्शीच्या मातीत जन्माला आलेला हिरा दिग्दर्शक अमर देवकर म्हणजे ‘म्होरक्या’ सिनेमाचा म्होरक्या.यांच्या सिनेमाने विविध फिल्म फेस्टिव्हलपासून ते राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मारलेली मजल विशेष लक्ष्यवेधी ठरली. प्रत्येक छोट्या मोठ्या फिल्मफेस्टिवलमध्ये ‘म्होरक्या’ म्होरक्या आहे हे सिद्ध होताना आपण बघितले आहे. पुरस्काराच्या माध्यमातून हा सिनेमा आपल्यापर्यंत पोहचला आणि आता हा सिनेमा सिनेमागृहात पोहचला आहे.
आपल्याकडे प्रत्येक गोष्टीत नेतृत्व करणारा म्होरक्या आपण बघितला आहे. राजकारणातला म्होरक्या, क्रीडा क्षेत्रातला म्हरोक्या, कला क्षेत्रातला. विविध क्षेत्रात म्होरक्या आपण बघितला आहे. एवढच काय आपले आई वडील सुद्धा आपल्यासाठी म्होरक्याच आहेत. विविध क्षेत्रातील नेतृत्वाच्या तत्त्वज्ञानावर चित्रपटात भाष्य केले आहे. मनोरंजनाबरोबर हळुवारपणे माणसाच्या संवेदना जिवंत होतील इतक्या ताकदीचा सरळ साधा पण, महत्वाच्या विषयावरचा हा चित्रपट बरच काही शिकवून जातो. जगताना रुबाबात,थाटात म्होरक्या बनून कस जगायचं ह्याची शिकवण देणारा चित्रपटाचा संदेश, माणूस म्हणून जगताना प्रेरणादायी ठरतो.
अमर देवकर यांनी म्होरक्या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘म्होरक्या’ बनवताना समाजातील जळजळीत वास्तवावर लक्ष्य केंद्रित केले आहे.कोणत्याही स्टार कास्टशिवाय सिनेमाच्या तगड्या विषयाची ताकदीची मांडणी ह्या जोरावर सिनेमा पैसा वसूल ठरतो. फार गुंतागुंतीचं कथानक न घेता तुलनेन सरळ साध कथानक प्रभावीपणे मांडण्याचा घाट दिग्दर्शकाने घातला आहे.
ही गोष्ट आहे, एका छोटाशा खेडेगावातली. मेंढ्या राखण्याच काम करणारा १३- १४ वर्षाचा मुलगा आहे. शाळेमध्ये त्याच नाव आहे मात्र मेंढ्या राखण्याच्या कामामुळे त्याला शाळेत जाणं शक्य होत नसत. एके दिवशी त्याला अचानक शाळेमध्ये जाव लागत. शाळेतील काही त्याचे वर्गमित्र त्याला माळरानावर घेवून जाण्यासाठी येतात. जबरदस्तीने त्याला त्यांच्याबरोबर जावे लागते. शाळेत गेला असता त्याला २६ जानेवारीसाठी वर्गमित्रांची परेडची तयारी दिसते. २० २५ मुले त्याच्या मागे उभे राहतात. त्याची लीडर म्हणून निवड करण्यात आलेली असते.
त्याच्या आधी त्या मुलाच्या मागे २० २५ मेंढ्या चालत असतात. एकेदिवशी त्याला अस वाटत कि ह्या मेंढ्या नाही शाळेतली २५ मुल माझ्या मागे उभी राहिली पाहिजेत. आणी सुरु होतो त्या मुलाचा संघर्ष. स्वतःला लीडर म्हणून सिद्ध करण्यासाठी अहोरात्र मेहनत करतो.स्वतःला आपण कशाप्रकारे लीड केलं पाहिजे, कुटुंबाचा म्होरक्या म्हणून कस तोंड दिल पाहिजे.पुढाकार घेवून समाजात म्होरक्याची भूमिका कशी निभवावी, अशा संदर्भांना धरून सिनेमा शेवटाकडे जातो.
आणि ह्या मेहनतीत कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते. तो लीडर होण्यासाठी शिकाव्या लागणाऱ्या गोष्टी कुणाकडून शिकतो. तो त्या शाळेतल्या मुलांचा लीडर होतो का. २६ जानेवारीला तो लीडर म्हणून उभा राहतो का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात जावून सिनेमा बघावा लागेल.