Around Valentines Day a lot of romantic films get released. One such love story is in the offing in the form of Premay Namah!
Upcomming Marathi Movie Songs Premay Namah 2017
मराठी चित्रपट ‘प्रेमाय नमः’ मद्धे प्रथमच ‘अंडरवॉटर सॉंग’!
व्हॅलेंटाईन डे च्या आसपास बरेच रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होतात. अशीच एक प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं नाव आहे ‘प्रेमाय नमः’ Premay Namah नावावरून कल्पना आली असेलच कि सिनेमाचा गाभा रोमँटिक आहे परंतु त्यातील प्रत्येक घटक म्हणजे कथा, संगीत, लोकेशन्स, दिग्दर्शन ई. मद्धे प्रेक्षकांना वेगळेपण बघायला मिळेल. मराठी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘अंडरवॉटर सॉंग’ प्रेक्षकांना बघण्याची पर्वणी मिळणार आहे. चंद्रशेखर जनावडेंच्या लेखणीतून अवतरलेले ‘झालो बेभान मी’ ह्या स्पेशल गाण्याला के. संदीपकुमार/चंद्रशेखर जनावडे यांच्या संगीताने चार चाँद लावलेत, आणि शहजाद व पॅमेला जैन ह्या गायकांनी आपल्या सुमधुर आवाजाने गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. ह्या चित्रपटाच्या सुमधुर संगीताचे अनावरण ६ फेब्रुवारी ला मराठी चित्रपट सृष्टीचा ‘बाजी’ आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा ‘इकबाल’, निर्माता व अभिनेता श्रेयस तळपदे ह्याच्या हस्ते व संपूर्ण ‘प्रेमाय नमः’ Premay Namah ची टीम आणि अनेक मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांच्या उपस्तिथीत थाटामाटात झाले. त्यावेळी श्रेयाषजी त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले ‘मराठी सिनेमा नेहमीच उत्कृष्ट संहिता आणि दर्जेदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडे त्याने तांत्रिक बाबींमद्धेही प्रगल्भता आत्मसात केलीय. ‘प्रेमाय नमः’ Premay Namah मधील ‘अंडरवॉटर सॉन्ग’ बघून तर मी खूपच इंप्रेस झालोय. पूर्ण टीमला माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा!’
चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे ज्याप्रमाणे हिंदी चित्रपटात सिनेमाच्या नावाचा ‘गेम’ बनवून (उदा. शाहरुख खान – फॅन, डॉन, ह्रितिक रोशन – क्रिश, सलमान खान – सुलतान, आमिर खान – दंगल ई.) सिनेमाप्रेमींना आकर्षित केले जाते, त्याच धर्तीवर निर्माता-दिग्दर्शकाने ह्या चित्रपटाचा ‘गेम’ तयार केला आहे ज्याचे ‘प्रेमाय नमः अँप’ Premay Namah App देखील चित्रपटाच्या संगीताबरोबर लाँच करण्यात आले.
एखाद्या गोष्टीचे पाण्याखाली चित्रण करायचे म्हणजे खूपच कर्मकठीण काम! पण ‘प्रेमाय नमः’ Premay Namah च्या टीमने अथक प्रयत्न करून रसिकजनांसाठी मराठी चित्रपटसृष्टीतले पहिले-वहिले ‘अंडरवॉटर’ गाणे चित्रित केले आहे. सिनेमातील प्रेमी युगुल देवेंद्र आणि रुपाली यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. दोघांनाही खूपच मेहेनत घेतली. इतर क्रू-मेम्बर्स ऑक्सिजन मास्क घालून पाण्याखाली राहू शकतात पण कलाकारांना ती मूभा नसते. दोघाही कलाकारांनी पाण्याखाली राहून श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा भरपूर सराव केला, प्रशिक्षित स्विमिंग इंस्ट्रक्स्टर च्या देखरेखीखाली. जास्तीत जास्त पाण्याखाली राहून, श्वास रोखून, गाण्यातील बिट्स चे ध्यान ठेऊन, योग्य एक्सप्रेशन्स देऊन शॉट्स ओ के करणे ही अत्यंत मुश्किल गोष्ट, परंतु देवेंद्र आणि रुपालीने खूप धाडसीपणे, दिग्दर्शकाचा पेशन्स सांभाळत, अपेक्षित परिणाम साध्य केला व सर्वांची वाहवा मिळवली.
Marathis first Underwater song in Premay Namah
Premay Namah Marathi Movie Song Download