झी मराठी वाहिनीवर चांगला प्रतिसाद मिळालेली एक मालिका म्हणजे, “खुलता कळी खुलेना”. एकेकाळी या मालिकेने रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. या मालिकेच्या निम्मिताने अनेक नवे चेहरे आणि तर इतर काही कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी लाभली.
याच मालिकेतली एक अभिनत्री अर्थात मयुरी देशमुख. आज मयुरी देशमुख हिचा चाहतावर्ग फारच वाढीस लागला असल्याचाही पहायला मिळतो. या मालिकेच्या नंतर मयुरीला आधीपेक्षा अधिक चाहता रसिकवर्ग मिळाला. त्याला कारणही तसचं होतं, मुळात मयुरी तिच्या अभिनयाच्या जोरावर तमाम महाराष्ट्राच्या पसंतीस उतरल्याची पहायला मिळाली. दुसरीकडे मयुरीच्या हावभावांमधे तिच्या स्मितहास्याची खासियत.
तिच्या चेहऱ्यावर जे नकळत स्मित उमटतं त्याने तर तरूणवर्ग खासकरून वेडावून सोडला असं म्हणावं लागेल. सिनेमे, नाटक यांची भविष्यातही चांगली वाटचाल करण्यास सज्ज झालेल्या मयुरीने खुलता कळी खुलेना या मालिकेतून पदार्पणाची संधी चांगलीच बखुबीने मिळवत आपली भुमिकेला योग्य न्याय देत तमाम सिनेसृष्टीला तिच्या कलेची दखल घ्यायलाही भाग पाडलं.
मयुरीच्या आयुष्यात तिने चांगलीच भरारी घेतली असताना तिच्या वैयक्तिक खाजगी आयुष्यात थोडीशी उलथापालथ झाली. मयुरीच्या सुखावर दुखांची बाधा येऊन पडली. आणि ती एका सं’क’टा’त अडकली. अभिनेता आशुतोष भाकरे याने २०२० सालात नै’रा’श्या’तून आ’त्म’ह’त्या केली. आशुतोष हा मयुरीचा पती होता. मयुरी त्याच्या अचानक जाण्याने प्रचंड नै’रा’श्या’त गेली होती. मयुरी आता त्याच्या पश्चात त्याच्या नसण्याचं दुख: पचवत पुन्हा नव्यानं खंबीरपणे उभी राहत कलाक्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाल्याची पहायला मिळते आहे.
अभिनेत्री मयुरी देशमुख आता स्टार प्लस या वाहिणीवरील “इमली” या मालिकेतून सर्वांच्या भेटीला आलेली पहायला मिळत आहे. अभिनेत्री मयुरी देशमुख हिला आता हिंदीतही चांगलीच ओळख मिळत असल्याची पहायला मिळते आहे. मयुरीच्या नव्या इमली या मालिकेतील तिच्या पात्राच्या कामाची सर्वच माध्यमातून चांगली तारीफ होत असल्याची पहायला मिळते आहे. तिच्या अभिनयाला पुन्हा एकदा बहर मिळू लागला आहे. आणि आता त्यामुळेच तिला तिच्या दुखातून सावरताना आभारही मिळत आहे. “टाईम्स ऑफ इंडिया” या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मयुरीने बऱ्याच गोष्टींवर मनमोकळेपणाने भाष्य केल्याचे पहायला मिळते.
मयुरी म्हणाली २०२० तिच्यासाठी फारच तणावपूर्ण ठरलं, तिला अनेक संकटांना तोंड द्याव लागलं. आशुतोषच्या जाण्याने तिच्यावर फार मोठा आ’घा’त झाला होता पण तरीही शेवटी स्वत:ला सावरत त्या दुखातून बाहेर पडणं गरजेच होतं आणि त्यातून बऱ्यापैकी बाहेर मी पडली आहे असंही ती म्हणाली. माझ्या कुटुंबात सर्वांनी सोबतच मित्रमैत्रीणींनीदेखील या दुखातून बाहेर यायला माझी मदत केली, असंही मयुरीने यावेळी सांगितलं. दरम्यान याच मुलाखतीत ती म्हणाली की, माझं आजही आशुतोषवर प्रेम आहे, तो कायम माझ्या सोबत आहे, हेच समजून मी आज आयुष्य जगत आहे.
मयुरी पुढे हेदेखील म्हणाली की, त्याच्या प्रेमाखातर ती उभं आयुष्य एकटीने जगू शकते. आशुतोषला लहान मुलं फार आवडायची, माझा मुलं दत्तक घेण्याचाही विचार आहे. ती असंही म्हटली की, मला अनेकदा दुसऱ्या लग्नाचा प्रश्न विचारण्यात आला पण तुम्हाला मुलं हवीत यासाठीच दुसरं लग्न करायची काय गरज आहे? ती पुढे हेदेखील म्हणाली की, मी आयुष्याकडे सकारात्मक आणि आशुतोषच्या नजरेतून पाहते.
तिच्या या मुलाखतीने अनेक रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठाम घेतला, अनेकांनी तिच्या या निर्णयाचं, तिच्या विचारांच अगदी भरभरून कौतुकही केलं आहे. दरम्यान आता मयुरीने तीन वर्षांपूर्वी एक नाटक लिहलं आहे, तेदेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवरून सर्वांना पहायला मिळणार असल्याचीही चर्चा आहे. “डिअर आजो” असं याच नाव आहे. आता मयुरीने तिच्या आयुष्याकडे एका वेगळ्या पैलूने पहायचं ठरवलं आहे, जे निश्चितच कौतुकास्पद आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!