मराठी सिनेअभिनेत्री पुजा सावंत हिचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना पहायला मिळतो आहे. या व्हिडिओच्या माध्यामातून तिने सर्व चाहत्यामंडळींना व रसिकप्रेक्षकांना आवाहन देखील केलेलं पहायला मिळते आहे. पुजा सावंत हिच्या या व्हिडिओमधे तुम्हाला पहायला मिळेल की, तिने एका घुबडाला जीवनदान दिलं आहे.

पुजा सावंत या अभिनेत्रीचं प्राणी व पक्षीप्रेम आजवर तिच्या चाहत्यांना सर्वज्ञात आहेच. कारण पुजा नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून स्वत:चे फोटो, व्हिडिओज तर शेअर करत असतेच याशिवाय तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या घरातले पोपट, खारूताई, मांजर यांचे विविध व्हिडिओज शेअर केलेले पहायला मिळतात.

आणि यावेळी मात्र तिने ज्या एका घुबडाला जीवनदान दिलं आहे, त्यासाठी खास तिने घरात एक वेगळी जागाही निर्माण केल्याची पहायला मिळत आहे. जखमी झालेल्या, नीट केलेल्या घुबडाला नंतर पुर्णपणे सुरक्षीत होईपर्यंत पुजाने आपल्या घरातील एका बॉक्समधे ठेवलं आहे. पुजाने हा व्हिडीओ शेअर करताना कसा कॅप्शन मेन्शन करत काही गोष्टी व्हिडिओमधून सांगितल्या आहेत.

ती यावेळी म्हणाली आहे की, “उन्हाळा जवळ आला आहे तर रस्त्यावरील भटकी कुत्री, इतर प्राणी व पक्षी यांकरता पाण्याची व्यवस्था सर्वांनी करावी. पाण्याच्या शोधात उन्हाळ्यात अनेक पक्षांसोबत फार विचित्र अपघात घडतात, ज्यात त्यांचा जीव धोक्यात येतो. कधीकधी ते पाण्याच्या टाकीतदेखील पडतात. तर अशाच एका टाकीत पडलेल्या घुबडाबद्दल आम्हाला समजलं, आणि आम्ही त्याची मदत केली.”

पुजा सावंत पुढे या व्हिडिओमधे बोलताना म्हणाली, “जेव्हा तिला या घुबडाबाबत समजले तेव्हा तिने तिच्याकडे घरी असलेल्या प्राथमिक किटच्या वापरातून घुबडावर उपचार केले. आणि नंतर त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. त्याच्यावर योग्य उपचार झाल्यानंतर त्याच्यात सुधारणा झालेली दिसून आली.

जेव्हा ते घुबड पुन्हा उडू शकणार होतं, हे आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही त्याला हवेत सोडून त्याचा मार्ग त्याला मोकळा केला.” पुजा सावंत हिने केलेल्या या घुबडाच्या मदतीबाबत सर्वांनीच तिचं फार कौतुक केलं आहे. पुजा सावंत या अभिनेत्रीच्या बाबतीत पाहिलं तर ती सुरूवातीच्या काळापासूनच एक फार संवेदनशील व्यक्तीमत्वाची कलाकार असलेली आपल्याला दिसून येते. सध्याच्या घडीला पुजा सावंत एका नृत्य कार्यक्रमाची जज म्हणून काम पाहत असल्याची पहायला मिळते.

याशिवाय खरं म्हणजे ती नव्या सिनेमातून लवकरचं मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची माहिती मिळते आहे. खरतरं घुबडावर केलेल्या उपचारानंतर पुजा अगदीच आनंदीत असल्याची पहायला मिळाली. तिने याअगोदरदेखील अशा बऱ्याचशा गोष्टी केलेल्या पहायला मिळतात.

पुजा सावंत सध्याच्या घडीला मराठी सिनेसृष्टीतली एक आघाडीची अभिनेत्री झालेली पहायला मिळते. पुजाच्या वाट्याला मराठीशिवाय आता हिंदीतही काही कामे येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तिच्या लुक्सवर तिचे चाहते नेहमीच प्रचंड फिदा असल्याचे पहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यात अगदीच सहजतेने जगणारी पुजा सावंत नेहमीच अनेकांसाठी एक आदर्श बनून राहिली आहे, हे मात्र नक्की.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!