सिनेसृष्टीत कधी कोणता कलाकार काय निर्णय घेणार याची साशंकता अनेकदा सर्वांच्या मनात निर्माण होतेच. तर सध्याच्या घडीला हिंदी सिनेसृष्टीत अर्थात बॉलीवुडमधे अशीच एक अजब गोष्ट थोडी पुन्हा नव्याने प्रकाशझोतात येत असताना पहायला मिळते आहे. ही गोष्ट आहे ती म्हणजे सर्वांच्या लाडक्या अभिनेता असलेल्या अजय देवगण याच्याविषयी.

अजय देवगण पुन्हा एकदा आपलं नाव बदलणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. खरतरं विशाल या नावापासून बदल करत आजवर सिनेसृष्टीत अजय या नावाने अजय देवगण वावरला आहे. आणि आता पुन्हा एकदा तो नेमकं कशासाठी त्याच्या नावात बदल करतोयं, हे जाणून घ्यायला हवं. अजय देवगण याने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर त्याच्या अकाउंटवरून शेअर केल्याचा पहायला मिळाला आहे.

या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने हॅशटॅग “एंटरटेनमेंट का ऑराऊंडर”, असा पोस्टवर उल्लेख करत “दुआ में याद रखना, नाम है सुदर्शन” हा कॅप्शन वापरत ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवरून तरी वाटत आहे की, अजयला त्याच्या चाहत्यांनी आता जुन्या नावाऐवजी नव्या नावाने पुकारावं.

अजयच्या या पोस्टवर त्याचे चाहते त्याला कमेंट्सच्या माध्यमातून बरेच प्रश्न विचारताना पहायला मिळाले आहेत. अजय देवगण याने मात्र फार खुलासा या गोष्टीबाबत अजूनही केला नाही. अजय देवगण याने या पोस्टवर तो पुन्हा एकदा महत्वपूर्ण गोष्टीचा खुलासा करणार अशी प्रतिक्रियादेखील नोंदवली आहे. आणि त्याच्या पुढील अपडेट बातमीवर आता त्याच्या चाहत्यांचं व सर्व रसिकप्रेक्षकांचं आवर्जून लक्ष लागलं असल्याचं पहायला मिळतं आहे.

अजय देवगण कायमच हल्ली त्याच्या एकूण एक नवनवीन प्रोजेक्टमधून रसिकप्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होताना पहायला मिळतो आहे. अजय देवगण आता संजय लीला भन्साळी यांच्याकडुन दिग्दर्शीत होणाऱ्या गंगुबाई काठीयावाडी या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने प्रदर्शित झाल्यावरच सोशल मीडियावर चांगलीच धुम उडवली होती.

या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमात प्रमुख भूमिकेत आलिया भट ही अभिनेत्री दिसणार आहे. परंतु अद्याप अजयची यातील भुमिका कोणती असणार हे स्पष्ट झालेलं नाही. हे एकप्रकारे चाहत्यांसाठी सरप्राईज ठेवल्याच समजत आहे. अजय देवगण समोर याव्यतिरिक्त अनेक चांगले मोठे प्रोजेक्टदेखील आहेत.

मैदान, आर आर आर, मेडे, गोलमाल 5, यांसारख्या सिनेमांमधून तो रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगण हिंदी सिनेसृष्टीतल्या केवळ अभिनेत्यांपैकी एक नाही तर तो नामांकित निर्मात्यांपैकीही एक झालेला पहायला मिळतो आहे. तो स्वत:च्या प्रोडक्शन हाऊसमधून अनेक चांगल्या सिनेमांची निर्मितीदेखील करताना पहायला मिळतो आहे.

अजय देवगण हिंदी सिनेसृष्टीत आजवर त्याच्या अभिनयातील विवध शैलींमुळे अधिक प्रसिद्ध आहे. शिवाय त्याने साकारलेल्या दिलजले, सिंघम, दिलवाले, यांसारख्या चित्रपटांमधील नायकांनीदेखील रसिकप्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा प्रभावीपणे यशस्वीरित्या उमटवला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!