बॉलिवुडमधील सिनेसृष्टीत अनेक गोष्टी आपल्याला नव्याने पहायला किंबहुना ऐकायला मिळतात. मुळातच काही गोष्टी आपल्याला फारच चित्रविचित्रही वाटून जातात. त्यात आता एक खास बात म्हणजे, बॉलिवूडच्या अनेक सेलीब्रेटींची काही खास अशी टोपण नावे आहेत. जी त्यांच्या आयुष्यातील काही खास व्यक्तिंनाच आजवर माहित होती.

या गोष्टींची माहिती काही ठराविक कलाकारांनी त्यांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतीदरम्यान दिलेली आपल्यला पहायला मिळते. यामधे येणारे सेलीब्रेटी होते ते म्हणजे प्रियंका चोपरा, श्रद्धा कपूर, सोनम कपूर, आलिया भट आणि रणबीर कपूर. अर्थात या पाचही सेलिब्रिटींची भारतात चांगलीच फॅन फाॅलोविंग आहे. त्यांचे चाहते नेहमी त्यांच्याबद्दल काही ना काही नवीन गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक असलेले वारंवार पहायला मिळतात.

यामधे आता प्रियंकाच्या बाबतीत पहायचं म्हटलं तर “मिमी” या टोपणनावाने ती संबोधल्या जात असायची. तिच्या आईनेच तिला हे नाव दिलं असल्याच प्रियंकाने सर्वांना सांगितलं होतं. याशिवाय या नावाची खासियत म्हणजे फ्रेंच अभिनेत्री मिमी रॉजर्स हिच्या नावावरून देण्यात आलं होतं. प्रियंका चोपरा हिचा मागेच प्रदर्शित झालेला द व्हाईट टायगर हा सिनेमा चांगलाच चर्चेत राहिला.

एका वेगळ्या धाटणीची या सिनेमाची निर्मिती असल्याने प्रेक्षकांना या सिनेमाची जशी उत्सुकता होती तसा हा सिनेमा चांगला तयार झाला होता. दुसरीकडे तिच्या बायोग्राफीवर आधारित प्रसिद्ध झालेलं पुस्तकदेखील चांगलच चर्चेत राहिलं आहे. त्याशिवाय तिच्या पुस्तकाला लोकांचा अफाट प्रतिसाद मिळालेलाही पहायला मिळाला.

यानंतर येते ती अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धाला तिच्या मित्रपरिवारने “चिरकुट” असं विनोदी टोपण नाव दिलेलं आहे. याव्यतिरिक्त सेलिब्रिटींमधील अभिनेता वरूण धवनदेखील तिला याच नावाने पुकारत असल्याच अनेकदा पहायला मिळालं आहे.

श्रद्धा कपूर हिच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर सध्याच्या घडीला ती तिच्या पुढच्या प्रोजेक्ट्सवर काम करत असल्याची खबर मिळते आहे. परंतु अद्यापही तिच्या पुढील प्रोजेक्सच्या नावांबाबत बरीच साशंकता आहे. श्रद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी भारतीय अभिनेत्री आहे. श्रद्धा नेहमीच इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटोज आणि इतर व्हिडिओज आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

यापुढे येणारी अभिनेत्री म्हणालं तर ती आहे सोनम कपूर. सोनम कपूर बरेच दिवस सिनेसृष्टीतून गायब असल्याची पहायला मिळते आहे. कदाचित लग्न झाल्यानंतर तिला सिनेमाकरता वेळ देणं तितकसं जमलं नसावं. सोनम कपूर हिला तिचे वडील अनिल कपूर चक्क थेट जिराफ या टोपणनावाने हाक मारत असतात.

अनेक ठिकाणी अनिल कपूर यांनी तिला जिराफ म्हणूनच संबोधल्याचं पहायलादेखील मिळालं आहे. या गोष्टीवरून एक तर्कदेखील अनेकांकडून लावण्यात येतो तो म्हणजे असा की, सोनम कपूर हिची मान थोडीशी अधिक लांब आहे. त्यामुळे तिचे वडील या गोष्टीवरून तिच्याशी नोकझोक करत राहतात. आता बऱ्याच दिवसांनंतर सोनम ब्लाईंड या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आता सध्याच्या घडीला जी अभिनेत्री सिनेसृष्टीत एकप्रकारे राज्य करत आहे, ती म्हणजे आलिया भट. आलिया भट हिने काळासोबत आपल्या अभिनयात बरेच प्रयोग करत आपल्या अभिनयाला एक योग्य व परिपूर्ण वाट दिली. आज आलियाच्या हातात एकापाठोपाठ एक प्रोजेक्ट असण्याच सर्वात मोठ कारण हेच आहे की तिने तिच्या अभिनय कौशल्यात अधिक भर टाकली. आलियाला तिच्या घरी ज्या टोपणनावाने ओळखल्या जाते ते नाव म्हणजे, “आलू”. तिचा मित्रपरिवारदेखील तिला याच नावाने ओळखतो.

यापुढे येतो तो सेलिब्रिटी आहे रणबीर कपूर. रणबीरला त्याची आई “रेमंड” या नावाने हाक मारत असते. त्याच कारण त्याची आई त्याला एक परफेक्ट व्यक्ती समजते. दुसरीकडे रणबीर याच मित्रपरिवारात टोपण नाव “डुग्गू” हे आहे. सध्या रणबीरच्या वाट्याला चांगला प्रोजेक्ट असल्याच पहायला मिळत आहे. “शमशेरा” व “अंदाज अपना अपना 2” या दोन त्याच्या आगामी सिनेमांची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली असल्याची पहायला मिळते आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!