आपल्याला अनेकदा काही ठराविक युजर्सकडून कलाकरांची सोशल मीडियावर थट्टा उडवल्याची प्रकरणं पहायला मिळतात. किंबहुना काहीजण कलाकारांच्या पोस्टवर तर कधी एखाद्या विशिष्ट गोष्टीवर फारच खालच्या थराला जाऊन टि’का’देखील करतात. मागे अभिनेता शशांक केतकर ते तेजश्री प्रधान यांच्यासोबतच अनेक इतर कलाकारांनादेखील टि’के’चा धनी व्हावं लागलं होतं, आणि तेदेखील अगदीच अ’स’भ्य भाषेत.
मुळात आता अशा ट्रोलर्सना त्यांच्याच भाषेत उत्तरही दिल्या गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांना समजेल कलाकार दरवेळी शांत राहतो, ती त्याची मजबूरी नसून ते केवळ तुम्हाला इग्नोर करत असतात. कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी पडलेल्या असतात, ते इतकेही निवांत नाहीत की त्यांनी प्रत्येकच गोष्टीला जबाबदार असलं पाहिजे. तर सध्या अभिनेत्री मानसी नाईक हिने पुढाकार घेत काल तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेतलेल्या लाईव्हच्या माध्यमातून तिने एकाला चांगलच झापल्याच पहायला मिळालं आहे. तिने घेतलेल्या त्या आ’क्रा’म’क पावित्र्यावर अनेकांनी तिचं कौतुक केलयं.
कितीही नाही म्हटलं तरी कधी ना कधी कलाकारांच्या संयमाचा बांध हा फु’ट’त असतो, आणि तेदेखील कधीतरी बोलून दाखवतात. अभिनेत्री मानसी नाईक आता लग्न झाल्यानंतर बराच काळ सिनेसृष्टीपासून थोडीशी दूर आहे, तसं पाहता कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून काही खास गोष्टीही सिनेसृष्टीत घडल्या नाहीयेत.
त्यामुळे आपल्या पतीला आणि कुटुंबाला वेळ द्यायला मानसी नाईक सध्या अधिक प्राधान्य देत असल्याचही दिसून येत आहे. मानसी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चांगलीच सक्रीय राहत असल्याची वारंवार पहायला मिळते. ती इन्स्टाग्रामवर व्हिडिओ, फोटो आणि इतर गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. तर आता आपण नेमका किस्सा काय घडला ते जाणून घेणार आहोत.
इन्स्टाग्राम लाईव्हच्या वेळी एका युजरने मानसी नाईक हिच्यावर अ’स’भ्य भाषेत एक कमेंट केली, मानसीच लक्ष त्याकडे गेलं आणि तिने मग त्याचा चांगलाच समाचार घेतला. मानसीला तिचा सं’ता’प यावेळी अनावर झाला होता तरी तिने त्या युजरला योग्यरित्या च’प’रा’क बसवली. त्या युजरने इतक्या खालच्या थराला जात, तिला बुधवार पेठेतल्या स्त्रीची उपमा दिली आणि या इतक्या ग’लि’च्छ कमेंटमुळे साहजिकचं मानसी नाईक भ’ड’क’ली.
तिने थेट प्रत्त्युत्तर देत विचारलं, तुम्ही मला बुधवार पेठ या ठिकाणी कधी पाहिलं आहे, राहिला प्रश्न पेठेतल्या महिलांच तर त्या अगदी धाडसानं काम करत असतात, त्यांच्याइतक मेहनतीने घर चालवण्यासाठी आणि इतर गोष्टी सांभाळण्यासाठी इतर कोणीच काम करत नाही. तुम्हाला जर इतकचं वाटतं असेल तर एकदा त्यांच्याप्रमाणे काम करून दाखवा, असं थेट मानसीने त्या युजरला बोलून दाखवलं.
मानसीने खऱ्या अर्थानं कमेंट करणाऱ्याला त्याच्याच भाषेत प्रत्त्युत्तर देत चपराक लगावली हे निश्चित म्हणावं लागेल. परंतु या किस्यानंतर सहसा प्रत्येकाला आज आपापली मुल्य आणि तत्व कुठे चालली आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. एखाद्या कलाकारावर थेट अशा अ’श्ला’घ्य स्वरूपात कमेंट करणं अगदीच चुकीच आहे. मानसीने पुढे हेदेखील सांगितलं की, बुधवार पेठेतील महिलांना प्रत्येकानेच खरतरं आदर देण्याची गरज आहे.
मानसीने त्या युजरला दिलेल्या त’डा’खे’बं’द उत्तरावर अनेकांनी तिच कौतुकच केलं आहे. दुसरीकडे मानसी नाईक सध्यातरी तिच्या खाजगी आयुष्यात चांगलीच व्यस्त असलेली पहायला मिळते आहे. मानसी नाईकचं लग्न प्रदीप खरेरा या बॉक्सरसोबत झाल्याच पहायला मिळतं. मानसी आपल्या निवडलेल्या जोडीदारासोबत चांगलीच आनंदात आयुष्य घालवत असल्याचीही पहायला मिळते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!