प्रत्येक मुलीची अपेक्षा असते की तिला एक चांगला ,तिच्यावर प्रेम करणार नवरा मिळावा,पण राधिकाच्या नशिबात होता तो गुरुनाथ .त्याला अद्दल घडवत स्वतःच्या पायावर उभी राहत ती बघता बघता ३०० कोटीची मालकीण झाली,आणि आता गुरुनाथ सारख्या खोट्या माणसाला घटस्फोट देऊन ती तिच्यावर प्रेम करणाऱ्या सौमित्रशी ती लग्न बंधनात बांधली जातेय.
तर आपण सगळ हे बोलतोय ते मराठी मालिका माझ्या नवऱ्याची बायको बद्दल जी झी मराठी वर रात्री ८वाजता प्रदर्शित होते.राधिकाचा पहिला नवरा गुरुनाथचे शनाया सोबतचे अफेयर तर चांगेलच चर्चेत राहिलय.शनाया व गुरुनाथने मिळून राधिका सोबत तिच्या शेजाऱ्यांना पण खूप त्रास दिलंय.पण आता राधिका गुरुनाथला घटस्फोट देऊन पुढ्यच्या वाटचालीसाठी तयार झालीय.
ज्यासाठी आपण कित्येकजण किती महिने वाट पाहत होतो ,तो क्षण जवळ आलाय ते म्हणजे आपल्या राधिका आणि सौमित्रच लग्न.त्याच्या ह्या लग्नाची अगदी जोरदार तयारी सुरु आहे.ह्या लग्नासाठी ठाण्यातला Ritz banquet हॉल बुक करण्यात आलाय.तसेच त्यांच्या लग्नासाठी बक्कळ अशी sponsorship ही मिळालीय.
आपली राधिका लग्नासाठी एकदम मस्त तयारी झालीय हा.तिने लाल रंगाचा गोल्डन बोर्डरचा एक छान शालू नेसलाय.तर तिने अंगावर घातलेले दागिने ५० लाखाचे असल्याचे बोलला जात आहे.हे दागिने खरे असून सर्व दागिने वामन हरी पेठे ज्वेलर्स ने Sponsors केलेत.
आता राधिका ३००कोटीची मालकीण म्हटल्यावर तिला एवढे दागिने तर हवेच ना.ह्या सगळ्यामध्ये सौमित्र पण काही मागे नाही बरं का. तो ही नवरदेवाच्या वेशात एकदम खुलून दिसतोय.सगळेच ह्या लग्नामध्ये छान दिसत आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त त्याचा उत्साह आहे. तिचे आधीचे सासुसासरे स्वतःच्या मुलीच्या लग्नप्रमाने तिचा लग्न करताना दिसत आहेत.
आता एवढं सगळा चांगले सुरू असतात गुरुनाथ शांत बसेल का ?मला तर नाही वाटत असं.तो पुढे नक्की काय करेल ?राधिका व सौमित्र ची बँड वाजवेल की त्याची स्वतःची बँड वाजेल ?की शनाया येऊन काही तमाशा करेल ?हे सगळं आपल्याला लवकरच कळेल. तोपर्यंत आपण राधिका व सौमित्र ला लग्नाच्या शुभेच्छा देवूयात.
Credit : तृषा तुकाराम चव्हाण