आपल्या समधूर आवाजाने रिअ‍ॅलिटी शोज् गाजविणाऱ्या मधुरा कुंभारने गायलेले हिरकणी चित्रपटातील ‘जगनं हे न्यार झालं जी’ या गाण्याने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. हे गाण मधुराच्या करियरमधील टर्निंग पॉईंट ठरलं असून सकाळ प्रिमियर पुरस्काराठी मधुरा नामांकित आहे. सोशल मीडियावरही प्रचंड गाजणाऱ्या या गाण्यामुळे खरंच आपल ‘जगनं न्यार झालं’ अस खुद्द मधुरा म्हणत आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शीत हिरकणी हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला चित्रपटाला मोठे यश मिळाले़ प्रसाद ओकच्या दिग्दर्शनाचे समिक्षकांकडूनही कौतुक झाले़ प्रेक्षकांनीही चित्रपटाला डोक्यावर घेतले़ सोनाली कुलकर्णीचा उत्कृष्ट अभिनय चित्रपटाची जमेची बाजू ठरला़़़ याच चित्रपटातील गाणी उत्तम व एक वेगळ्या धाटणीचा संगितकार म्हणून ओळख असलेल्या अमितराजने संगितबद्ध केली. यातील जगनं हे न्यार झालं जी हे गाण मधुरा कुंभारने गायल. यात अमितराजने मधुराला वाव दिला, स्वातंत्र दिले व एक छान सुंदर गाण बहरून आल व आज प्रेक्षकांच्या ओठावर हे गाण आहे़.
सोशल मीडियावर ‘छा गये’

मराठी चित्रपटसृष्टीला अनेक उत्कृष्ट, प्रसिद्ध गाणी देणाऱ्या अमितराजने या गाण्यासाठी मधुराची निवड केली. मधुरा या गाण्याला न्याय देऊ शकेल हा विश्वास अमितराजला होता व मधुराने तो सार्थ ठरविला. उत्तम अस गाण साकारलं असून या गाण्याचे अनेक टिकटॉक व्हिडिओत वापर झाला. सोशल मीडियावर हे गाणं अगदी छा गये या प्रमाणे गाजले. आपल्याला गातांना मिळालेले स्वातंत्र यातून अतियश उत्तम असं गाण प्रेक्षकांसमोर आल्याचे मधुरा सांगते.


मुंबई विद्यापीठात सुवर्णपदक पटकावून वेगवेगळ्या शैलीत गाण्याची आपली कला मधुराने कष्टाने जोपासत वेगवेगळे चित्रपट, नाटक, अनेक कार्यक्रम गाजविले. सूर नवा ध्यास नवा या कलर्स मराठीवरील कार्यक्रमातही मधुराच्या गाण्यांचे भरभरून कौतुक झाले. देश, विदेशात तिच्या गाण्यांचे लाईव्ह प्रोग्रॅम झाले त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला. आता तिच्या जगन हे न्यार झालं जी या गाण्याला सकाळ प्रिमियर साठी नामांकन मिळाले असून तिला हा पुरस्कार मिळावा यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा..