लव्ह लग्न लोचा टीम आहे नागपूरला तर फ्रेशर्स पोहोचले नाशिकला
शहराच्या गर्दीत, गडबडीत निसर्ग सौंदर्य, फॅमिली सोबत वेळ घालावणे, सिनेमा, नाटक, छंद यांचा कधीच ताळमेळ बसत नाही. या इंटरनेट, प्रगती, जागतिकीकरणाच्या वेगवान युगात माणूस आपले माणूसपण हरवत चालला आहे.त्याच्याकडे साध्या साध्या गोष्टीं साठी वेळ नाही चूलीवरचे चवदार भाजी भाकरी ; ओरपायास कालवण सुकि मासळी तोंडिलावण. गुरगुट्या भात त्यावर लाल वाटणाचे सार असं काहीसं खाण्याचा कितीही मूड झाला तरीही शहरात जागोजागी बनलेल्या गावाच्या आठवणीतलं जेवण फिकचं असतं. शहरातील जेवणात गावाची चव कधीच मिळत नाही त्यासाठी शहरातील ताणतणावापासून दूर गावी जाऊन निवांत आराम करणं हा एकच राजमार्ग असतो . पण प्रत्येकाच्या नशिबात हे असतंच असे नाही. पण सध्या झी युवा या वाहिनीवरील दोन मालिकांमधील कलाकारांच्या नशिबात हा अनुभव आलाय आणि त्यामुळे रोज च्या सेट पासून थोडा हटके निसर्ग रम्य अश्या वातावरणात सध्या यांचं शूटिंग सुरु आहे.
लव्ह लग्न लोचा या मालिकेत सर्व कलाकार नागपूर ला आले आहेत. विषय आहे विनयची एंगेजमेण्ट. या कारणासाठी सगळेच सध्या विनयच्या गावी नागपूरला दोन कार घेऊन, लॉन्ग ड्राईव्हची मजा घेत आले आहेत. आता नागपूरला ” लव्ह लग्न लोचा” मधील कलाकार किती रमतात, तिथे काय काय मजा होते आणि मुख्य म्हणजे विनयची एंगेजमेंट होते का? हि सर्व धमाल अनुभवायची असेल तर पाहात राहा झी युवावर लव्ह लग्न लोचा, सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ८:३० वाजता!
फ्रेशर्स मालिकेत सुद्धा नाशिक ला जाण्याचा प्लॅन सुरु आहे. पुढील ट्रॅक मध्ये अशी एक गोस्ट होते कि पहिला सायलीला आणि तिच्या पाठोपाठ आपल्या अख्ख्या फ्रेशर्स ची टीमला नाशिक ला जावे लागते. फ्रेशर्स ची टीम सुद्धा बरयाच काळानंतर त्यांच्या कॉलेजच्या सेटवरून बाहेर पडून निसर्गाचा आणि नाशिककरांचा अनुभव घेणार आहेत. आता नाशिक मध्ये जाऊन फ्रेशर्स ची नक्की काय मजा येणार आहेत. हे पुढच्या काही भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळेलच.
झी युवावर फ्रेशर्स सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ७:०० वाजता पाहायला मिळेल.