आपण बर्याच स्टार किड्स आणि चाइल्ड अॅक्टर्सविषयी ऐकले असेल जे भरपूर प्रसिद्ध असतात. आज आम्ही अशाच एका बाल कलाकाराबद्दल माहिती देणार आहोत, जिला कदाचित आपण तिच्या अभिनयासाठी ओळखत नसाल, परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही सिनेमा पहायला सिनेमा हॉलमध्ये जाता तेव्हा तुम्ही ‘नो स्मोकिंग एड’ पाहिले असेल, ज्यात एक सुंदर लहान मुलगी वडिलांसोबत बसलेली दिसली असेल.
तुम्हाला या मुलीची निरागसता नक्कीच आवडली असेल. सिमरम नाटेकर असे या लाडक्या बालिकेचे नाव असून तिचे वय आता साधारण 19 वर्षांच्या आसपास आहे.
ही जाहिरात सुमारे 10 वर्ष जुनी आहे आणि आपण अंदाज लावू शकता की ही गोड मुलगी आता मोठी झाली आहे. हि जाहिरात प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळते. किमान हि जाहिरात 2-3 वेळा येते त्यामुळे आपणाला या लहान मुलीने केलेला अभिनय नक्कीच आवडला असेल.
आता हि लहान सिमरन खूप मोठी झाली आहे, पण तिच्या चेहऱ्यावर तीच सुंदरता आणि निरागसता आहे. या जाहिराती नंतर सिमरनने अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. ती बरीच प्रसिद्ध देखील आहे.
सिमरन हि मुंबईची रहिवाशी आहे. ती सध्या इंस्टाग्राम आणि फेसबुक या समाजमाध्यमांवर नेहमी आपले फोटो शेअर करते ज्यामुळे तिला बरेच लोक फोल्लो करतात.
या जाहिरातीनंतर त्याने बर्याच टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले. डोमिनोज, व्हिडिओकॉन, क्लिनिक प्लस, बार्बी इत्यादी अनेक जाहिरातींमध्येही सिमरन मुख्य भूमिकेत दिसली आहे. तसेच नो स्मोकिंगच्या 48 सेकंदांच्या ऍडमध्ये सिमरनने चूप चांगली भूमिका केल्याने ती खूप प्रसिद्ध देखील झाली होती.
सोनी टीव्हीच्या आगामी कार्यक्रम ‘पहरेदार पिया की’ मध्ये कुंवर रतनसाच्या बहिणीच्या भूमिकेत सिमरन दिसली आहे. ‘दावते-ए-इश्क’ मध्येही सिमरन दिसली होती. सिमरन सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव आहे.
इंस्टाग्रामवर सिमरनचे 144k फॉलोअर्स आहेत. याशिवाय सिमरन डिस्ने चॅनल कॉमेडी शोमध्येही दिसली आहे. सिमरन जितके टीव्ही जगात व्यस्त राहते तितकेच ती अभ्यासातही लक्ष देते.
एका मुलाखती दरम्यान तिने सांगितले की आता काही दिवस तिला टीव्ही इंडस्ट्रीमधून ब्रेक घेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. एक यशस्वी अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न आहे, परंतु अभ्यासही खूप महत्वाचा आहे. अशी अपेक्षा आहे की काही वर्षांच्या विश्रांतीनंतर ती पुन्हा एकदा पुनरागमन करेल.