संगमरवरी, लाल वाळू आणि हिंदू-मुस्लीम-पर्शियन वास्तूस्थापत्याचा असा हा अजब ताजमहाल, हीदेखील त्याची ओळख. ताजमहालबद्दल नेमकं काय जाणता? मग या गोष्टी तुम्हाला माहित हव्याच… “ताजमहाल” आग्रा शहरात दिल्लीजवळ असलेली एक भव्यदिव्य सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य वास्तू. पण आज आपण सर्वसामान्यांना ज्ञात नसलेल्या या वास्तूबद्दलच्या काही बाबींवर प्रकाश टाकत आहोत. तर पाहुयात या खास गोष्टी.

ताजमहाल हा संपूर्ण भारत आणि आशियामधून आणलेल्या साहित्यापासून बनविला गेला. आणि तो आग्रा शहराच्या दक्षिण टोकाला एका छोट्या भूमि पठारावर बांधला गेला. महत्वाची दखल घेण्याची बाब म्हणालं तर सुमारे तीन एकर क्षेत्र आधी खोदले गेले आणि नंतर कचरा भरून नदीच्या पृष्ठभागापासून पन्नास मीटर उंच केले. मुख्य समाधीच्या ठिकाणी, पन्नास विहिरी खोदल्या गेल्या आणि कंकडांनी भरल्या जाऊन पाया भक्कम बांधला गेला.

मुळ पायाभरणी व समाधी बांधण्यासाठी सबंध बारा वर्षे लागली. सहसा विचार केल्यास ताजमहाल बांधण्याचा एकूण खर्च मूल्य अंदाजे 3 अब्ज 20 कोटी रुपये आहे आणि जर तो सध्याच्या चलनात रूपांतरित केला तर साधारण: कोट्यवधी डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा म्हणावा लागेल.

बांधकामादरम्यान एक हजाराहून अधिक हत्ती वाहतुकीसाठी वापरण्यात आले होते; या बाबी अचंबित करतातच. पांढरा संगमरवर नाही म्हटलं तरी राजस्थान, पंजाब, अफगाण व श्रीलंका अशा विविध भागातून मागवला गेला होता. सर्वात खास म्हणजे पहिल्यांदाच एक वास्तू उभारणीसाठी उत्तर भारतातील सुमारे वीस हजार मजुरांची फौज सतत कार्यरत होती.

या वास्तूच्या बनावटीत मुख्य हात हा घुमट डिझाइनर म्हणजे इस्माईल (ए. के. इ. इस्माईल खान), तुर्क साम्राज्याचे मुख्य; यांचा मानला जातो. चक्क लाल वाळूच्या सरंक्षण इमारतींनी ही वास्तू वेढल्या गेली, हे अजबच मानावं लागेल. आणि या भिंतींच्या बाहेरील जागेवर अतिरिक्त समाधी आहेत.

ज्यात शाहजहानच्या इतर बायका पुरल्या गेल्या. तसेच मुमताजच्या प्रिय दासीसाठी एक विशाल समाधी देखील बांधली गेली आहे. या इमारती देखील बहुतेक लाल वाळूच्या दगडाने बांधल्या गेल्या आहेत. आणि त्या काळातल्या लहान थडग्यांचे चित्रणही इथे आढळते. या तटबंदीच्या बागांमध्ये आतील बाजूस खांब असलेले आर्च वे कॉरीडोर आहेत.

येथील हिंदू मंदिरांची शैली नंतर पुढे इतर मशिदींमध्येही वापरण्यात आली हे विशेष. इथल्या मशिदींचे मूळ रूप शाहजहांने बांधलेल्या इतर मशिदींशी खासकरुन दिल्लीच्या जामा मशिदीसारखेच आहे. ताजमहालाच मुख्य आकर्षण म्हणजे त्यावरील किरीट कलश.

मुख्य घुमटाच्या मुकुटांवर जे कलश आहे, ते शिखर कलश सुरुवातीच्या काळात सोन्याचे होते परंतु आता ते पितळाचे बनलेले आढळून येते. हा किरीट-कलश पर्शियन आणि हिंदू वास्तुकलेच्या घटकांचे एकत्रित संयोजन आहे. हे हिंदू मंदिरांच्या शिखरावर देखील आढळते.

या कलशात एक चंद्र आहे, ज्याचे टोक स्वर्गाकडे आहे. त्यांच्या नियोजनामुळे चंद्राची टीप आणि कलश त्रिशूलचे रूप तयार करतात, जे हिंदू देवतांचे प्रतीक मानले जाते. येथील मिनारे ही मशिदीत नमाज अदा करण्यासाठी बनवलेल्या मिनारांप्रमाणेच बांधले गेले आहेत.

या मिनारांमध्ये एक विशेष गोष्ट आहे, हे चार बाह्य बाजूने वाकलेले आहेत; जेणेकरून कधी पडल्यास ते बाहेरील बाजूस पडतात आणि मुख्य इमारतीला कोणतेही नुकसान पोहोचू शकत नाहीत. तर असा आहे हा वेगळ्या दृष्टीतला ताजमहाल जो आजवर केवळ प्रेमाची निशाणी म्हणूनच अधोरेखित झाला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.