टाईमपास करताय का ? नाही म्हणजे तसं म्हणणं नव्हतं टाईमपास बद्दल तुम्हाला काय वाटतं ? काय वाटणार. तुम्हाला टाईमपास हा चित्रपट माहीत असेल. कुणाला नसणार माहीत? कारण त्या चित्रपट ने इतिहास केला होता कमाई चा मराठी मध्ये. त्याच चित्रपट मध्ये काम केलेले कलाकार सुद्धा खूप लोकप्रिय झाले होते.

प्राजु म्हणून फेमस झाली ती अभिनेत्री. आज खूप चर्चेत आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. पण साधे सुधे नाही. तर कोणते ? चला मग पाहुयात.

 

गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

 

कायम सिंपल लूकमध्ये पाहायला मिळणाऱ्या केतकीने तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोशूटमध्ये केतकीला ओळखणंही कठीण झालं आहे.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. केतकीच्या चाहत्यांना तिचा हा ही अंदाज भावला आहे. तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील.

केतकीने तिच्या लूकमध्ये वेगवेगळे प्रयोग केले असल्याचे पाहायला मिळतंय. करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल. टाईमपास’, ‘काकस्पर्श’, ‘तानी’ या सिनेमात केतकी माटेगावकर झळकली आहे.

अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिकादेखील आहे. ती अभिनेत्री आणि गायिका म्हणून खरचं खूप उत्तम आहे. आणि सुंदर ही आहे.

 

सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय.

केतकी ही मराठी मधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचे लाखो चाहते आहेत. सर्वाना एकच प्रतीक्षा लागलेली आहे की ती नवीन गाणं किंवा अभिनय केलेला सिनेमा कधी घेऊन येतेय.

तिला तिच्या पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा.