बॉलिवूड चं ग्लॅमर हे प्रेक्षकांना ही खूप आहे. त्यात काम करणारी कलाकार मंडळी काय करतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुकता दाखवत असतात. सैफ आणि करीना कपूरचे तर लाखो चाहते आहेत. त्यांना या दोघांच्या रिलेशन बाबत जाणून घ्यायचं आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

 

बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय कपल म्हणून अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खानकडे पाहिले जाते. करिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

 

ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सतत चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच करिनाने चॅट शोमध्ये सैफ आणि तिच्या विषयी वक्तव्य केले.

करिनाने तिचा चॅट शो ‘वॉट वुमन वॉन्ट’मध्ये पाहुणा म्हणून अभिनेता कुणाल खेमूला बोलावले होते. त्या दोघांनामध्ये मजा मस्ती सुरु होती.

 

दरम्यान करिना कुणालला विचारते त्याचे आणि पत्नी सोहाचे भांडण झाले की सर्वात पहिले सॉरी कोण बोलतं? त्यावर कुणालने तो स्वत: सर्वात पहिले माफी मागत असल्याचे सांगितले. सोहाच्या डिक्शनरी सॉरी हा शब्दच नाही असे कुणाल बोलतो.

दरम्यान कुणालचे बोलणे ऐकून करिना देखील म्हणते आमच्यामध्ये भांडण झालं की सैफ पहिले माफी मागतो. ‘सैफ पण पहिले माफी मागतो. मला असे वाटते की सर्वात पहिले पुरुषच माफी मागतात. नेहमी तेच चुका करतात असे मला वाटते. त्यामुळे ते पटकन माफी मागतात’ हसतहसत करिना म्हणते.

एका शो मध्ये तिने हे खुलासे केले आहेत. करीना आणि सैफ ला तैमुर नावाचा प्रसिद्ध मुलगा आहे. त्यानंतर आता करीना पुन्हा बाळाला जन्म देणार आहे. त्या साठी तिला आणि कपूर घराणे यांना खूप खूप शुभेच्छा.