‘कारे से’, आर्या आंबेकरचं नवं हिंदी गाणं
संगीताने आपल्या नेहमीच्या जगण्याला जान येते, इतकेच नव्हे तर संगीतामुळे आपल्या आयुष्याला अर्थ मिळतो. संगीत ही अशी कला आहे जी एखाद्याच्या गोंधळलेल्या मनाल शांत करु शकते आणि शांत मनाला मस्ती-धमालमध्ये गुणगुणायला भाग पाडते. कोणत्याही मनोरंजनसृष्टीतील गाणं असो आपल्याला ते आवडतेच. पण आज येथे मराठी सिनेसृष्टीतील गाणी, संगीतकार, गायक यांची विशेष दखल घ्यावीशी वाटते. आपल्या मराठी सिनेसृष्टीत अनेक सुंदर गाणी आहेत, गाण्यांना सुंदर आवाज देणारे गायक आहेत, मनाला भावूक करतील असे गीतकार आणि गुणगुणायला भाग पाडतील असे संगीत देणारे संगीतकार आहेत. या सगळ्यांमुळे प्रेक्षकांना नेहमीच गाण्यांची मेजवाणी मिळते आणि आज खास मेजवाणी आहे असं म्हणायला हरकत नाही.
आर्याने ‘रमा माधव’, ‘बालगंधर्व’, ‘गोष्ट तिच्या प्रेमाची’ या मराठी चित्रपटांसाठी आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या प्रसिध्द मालिकेसाठी गाणं गायलं आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘सा रे ग म प’ या रिऍलिटी शो मधील लिटिल चॅम्प आणि आता मोठी झालेली सुंदर गायिका आर्या आंबेकर हिचे नुकतेच एक हिंदी गाणं सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे.
आता ‘कारे से’ हे हिंदी गाणं आर्याने गायले आहे.‘कारे से’ या गाण्याचे बोल रोहित निकम याने लिहिले असून संगीत देव यांनी दिले आहे. आर्या प्रत्येक गाण्यातून प्रेक्षकांचे मन जिंकून घेते आणि आता परत एकदा ती प्रेक्षकांचे मन जिंकणार याची खात्री वाटते.