धू’म, सत्यमेव जयते, बा’ट’ला हाऊस ह्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता जॉन अब्राहम मिडियापासून दूरच राहणे पसंत करतो. त्यामुळे त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल फारशी माहिती नाही.
जॉन 2002 पासून 2011 पर्यंत अभिनेत्री बिपाशा बासू सोबत रिलेशनशिपमध्ये होता. 2011 मध्ये हे नाते संपुष्टात आले आणि 2014 मध्ये जॉन प्रिया रांचुलसोबत विवाह बंधनात अडकला.
बिपाशाबरोबर ब्रे’क’अ’प होण्यामागे प्रियाच असल्याचं बोलल्या गेलं होतं. तेव्हा जॉननेच एका मुलाखतीत स्पष्ट केले की, तो प्रियाला बिपाशाबरोबर ब्रे’क’अ’प झाल्यानंतर भेटला आणि ह्या अ’फ’वां’ना त्याने पूर्णविराम दिला.
प्रिया एनआरआय आर्थिक विश्लेषक आणि वर्ल्ड बँकेत इन्व्हेस्टमेंट बॅंकर म्हणून अमेरिकेत काम करते. प्रिया उच्च शिक्षित असून तिने लंडनच्या बिझिनेस स्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण घेतल्यानंतर ती काही दिवस लॉस एंजेलिसमध्ये राहिली असून ती आता मॅ’क्ला’ड गं’ज’ला राहते.
2011 मध्ये जॉन आणि प्रियाची पहिली भेट जिममध्ये एका कॉमन फ्रेंडमार्फत झाली. ह्याच जिममध्ये बिपाशा-जॉन एकत्र काम करायचे. मात्र, बराच काळपर्यंत बिपाशाला त्या दोघांच्या अ’फे’अ’र’ची माहितीही नव्हती.
3 जानेवारी 2014ला लॉस एंजेलिसमध्ये दोघांनी अत्यंत साध्या आणि खाजगी पद्धतीने लग्न समारंभ उरकला. जॉनप्रमाणे प्रियाला ही मिडियापासून दूर राहायला आवडते.
प्रियाबद्दल जॉन म्हणतो की, “प्रिया माझ्या व्यवसायात खास भूमिका निभावते. तिला नेहमी पडद्यामागेच राहायलाच आवडते. ती माझी गुवाहाटीमध्ये असणारी नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी फुटबॉल टीम खूप चांगल्या प्रकारे हाताळते. एखादी टीम हाताळणे हे एखाद्या प्रोडक्शन टीमला हाताळण्यासारखे आहे.”
नुकताच प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ह्यात ती जॉनच्या पावलावर पाऊल ठेवत जिममध्ये वर्कआऊट करताना दिसून येत आहे.
व्हिडीओमध्ये प्रिया तिच्या खांद्यावर वजन उचलताना आणि एका पायाने स्क्वाट करताना दिसून येत आहे. तिचा अवाक् करणारा व्हिडीओ पाहून वाटतं की तिने जॉनकडून बरेच काही शिकले आहे आणि ती ही फिटनेसच्याबाबतीत जॉनसारखीच जागरूक आहे.
ह्या आधी प्रियाने तिचे आणि जॉनचे काही गमतीशीर फोटो ही इन्स्टाग्रामवर शेअर केले होते आणि त्यात लिहिले होते की “तू त्या लोकांपैकी आहे का जे नेहमी प्रत्येक फोटोमध्ये डोळे बंद करतात?” ह्यावरून दिसून येते की दोघे एकत्र असताना किती आनंदी असतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.